या पाझर तलावाचे काम अद्याप अपूर्ण आहे. पाझर तलावाचे दगडी पिचिंग, सांडवा काँक्रिटीकरण, धरणातील दगडांचे ढीग, वाळलेली लाकडे आदी कामे अपूर्ण आहेत. याशिवाय काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. तरी माजी सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी हा तलाव इतक्या गडबडीने हस्तांतरित का केला, याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विनोद कांबळे, दयानंद साळवी, दत्तात्रय चौगले, भिकाजी तिप्पे, डी. आर. चौगले, शिवाजी तिप्पे, बळवंत तिप्पे, बाळू तिप्पे, अर्जुन मशाळकर, आनंदा कोकितकर आदी उपस्थित होते.
कोट...
तमनाकवाडा येथील पाझर तलावाचे काम उत्कृष्ट झाले आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी तलावाच्या हस्तांतराची मागणी केली. म्हणून हस्तांतर केले. काम उत्कृष्ट झाले असून, उरलेले काम पूर्ण केले जाणार आहे.
– यशवंत थोरात, तत्कालीन जलसंधारण अधिकारी, कोल्हापूर.
फोटो:- तमनाकवाडा (ता. कागल) येथे बांधकाम सुरू असलेला पाझर तलाव.