कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून झालेली कामे निकृष्ट दर्जाची असून या कामाची चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलन अंकुशने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक कामकाजासाठी दोन खोल्या बांधणे, हरिजन स्मशानभूमी कंपाउंड, कुस्ती मैदान स्टेज बांधकाम केले आहे. अंदाजपत्रकानुसार कामे झाली नाहीत. शिवाय नजर मूल्यांकनावर ८० टक्के रक्कम देणे, वेळोवेळी मेजर बुकात नोंद न करणे, अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार काम नसणे या गंभीर बाबी वेळोवेळी निदर्शनास आणून देखील ग्रामपंचायत तांत्रिक अधिकारी पंचायत समिती बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, शाहीर बाणदार, प्रकाश माणगांवे यांच्या सह्या आहेत.