शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

‘सीपीआर’मध्ये तिसरे अपत्य असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:47 PM

कोल्हापूर : शासकीय सेवेतील कर्मचाºयांना मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे, त्यानुसार ...

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचा आदेश ‘पतित पावन संघटने’ची तक्रार

कोल्हापूर : शासकीय सेवेतील कर्मचाºयांना मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे, त्यानुसार तिसरे अपत्य असूनही सेवेत अनेक वर्षे असणाऱ्या रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्याचा चौकशी अहवाल त्वरित पाठविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना दिले. त्याबाबतचे पत्र नुकतेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पाठविण्यात आले आहे.शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि. २८ मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्या कर्मचारी अगर अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे; पण याबाबत ‘सीपीआर’मध्ये कारवाई होत नसल्याची तक्रार ‘पतित पावन संघटने’च्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी गेल्याच महिन्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या सहसंचालकांकडे, तसेच जिल्हाधिकारी दौलत देसाई, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्याक डे केली होती.

त्यामध्ये, वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयात डॉ. सुजाता रवींद्र नामे, डॉ. रवींद्र दयानंद नामे, डॉ. सुधीर शामराव सरवदे या अधिकाऱ्यांसह श्रीकृष्ण दादाराव कांबळे यांना पहिल्या दोन मुली असतानाही दि. २८ मार्च २००५ नंतर तिसरे मुलगा अपत्य असूनही त्यांनी शासनाकडून बेकायदेशीर पदोन्नती घेतली, असे अनेक कर्मचारी येथे कार्यरत असताना त्यांच्या कौटुंबिक नोंदी सेवापुस्तकात नाहीत, तसेच ही अपत्याबाबतची माहिती दि. २५ सप्टेंबर २०१९ पर्यंत शासनास कळविणे बंधनकारक होते; पण ती त्यांनी शासनास कळविली नसल्याची तक्रार करून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.दरम्यान, या तक्रारीची दखल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने गंभीरपणे घेतली असून, त्याबाबत सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पत्र पाठवून या प्रकरणाची सखोलपणे चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल अधिष्ठातांनी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह संचालनालयास तत्काळ सादर करावेत, असा आदेश दिला आहे.

 

मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य असणारे रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत चौकशी करण्यासाठी तक्रार निवारण समितीअंतर्गत स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. त्यांचा चौकशी अहवाल नोव्हेंबरअखेर प्राप्त झाल्यानंतर तो संचालनालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांच्यावर संचालनालयामार्फत कारवाई करण्यात येईल.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता,रा. छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर