कोल्हापूर : ‘आयआरबी’ने केलेल्या रस्त्यांच्या कामाचा टेस्टिंग रिपोर्ट आज, शुक्रवारी रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखालील त्रयस्थ मूल्यांकन समितीच्या पुण्यातील बैठकीत सादर केला जाणार आहे. प्रत्येक कामाचा दर्जा तपासून, इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या मदतीने नव्याने मोजमापे घेण्याचे काम संपले आहे. या अहवालानंतरच प्रकल्पाचे नेमके मूल्य किती ठरविण्यास मदत होईल. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा अहवाल आल्यास प्रकल्पच नाकारला जाऊ शकतो, अशी माहिती समितीचे सदस्य व वास्तुविशारद राजेंद्र सावंत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.संतोषकुमार उपसमितीची बैठक पुण्यातील रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात गुरुवारी होत आहे. मात्र, प्रकल्पातील कामांचा टेस्टिंग रिपोर्ट आला नसल्याने बैठक उद्यापर्यंत पुढे ढकलली. प्रकल्पाचा नेमका खर्च कशा पद्धतीने ठरवावा, याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. रस्त्याखालील युुटिलिटी पाईप्स्सह न झालेल्या कामांच्या मूल्यांबाबतही बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. निकृष्टे काम झाल्याचे सिद्ध झाल्यास प्रकल्पच रद्दची मागणी होणार आहे. त्यामुळे बैठकीला विशेष महत्त्व आहे. (प्रतिनिधी)टेस्टिंग रिपोर्ट आल्यानंतरच प्रकल्पाचा नेमका खर्च काढणे सोपे जाणार आहे. टेस्टिंग रिपोर्टमध्ये निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे सिद्ध झाल्यास प्रकल्प नाकारण्याचा अधिकार आहे. - राजेंद्र सावंत, समिती सदस्य
‘आयआरबी’ रस्त्यांचा दर्जा आज ठरणार
By admin | Published: June 05, 2015 12:28 AM