कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) लेखापरीक्षणाच्या प्राथमिक अहवालात अनियमितता दिसत आहे. याबाबत संघाकडे खुलासा मागितला आहे, अंतिम अहवाल आल्यानंतर त्यामध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. याबाबत, ‘गोकुळ’च्या विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केली होती.मंत्री विखे-पाटील हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी हे ऊस दराच्या आंदोलनाकडून महसूल विभागाकडे कधी वळले? महसूल विभागातील बदल्या पहिल्यांदाच एवढ्या पारदर्शक झाल्या आहेत. विनाकारण आरोप करू नये, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावेत, उगीच मुक्ताफळे उधळू नयेत.
‘मुद्रांक शुल्क’चे चौकशीचे आदेशगुंठेवारी, तुकडेवारीच्या कारभारात आमच्या विभागातीलच काहीजण सामील आहेत. याबाबत, १५ जुलैपर्यंत परिपूर्ण धोरण येत आहे. मुद्रांक शुल्क विभागाची चौकशी करणार असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.दाखले वेळेत देण्याच्या सूचनापोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दाखल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आगामी शैक्षणिक वर्षापूर्वी काही पर्यायी व्यवस्था करता येते का? याची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये भावदूध दराबाबत राज्यस्तरीय समिती गठित केली असून, गायीच्या दुधाचा खरेदी भाव किमान ३५ रुपये असला पाहिजे, याबाबत धोरण ठरवीत आहे. सहकारी व खासगी दूध संघांना तो बंधनकारक राहणार असून, पशुखाद्य कंपन्या कच्च्या मालाचे दर वाढल्याचे कारण पुढे करीत दर वाढवितात. त्यांनाही २५ टक्के दर कमी करण्याचे आदेश दिले असून, अन्यथा कारवाई करू, असा इशारा मंत्री विखे-पाटील यांनी दिला.
‘अमूल’वर बंदी नाही‘अमूल’ची कार्यक्षमता चांगली असून, ते प्रतिलिटर ४०, तर आम्ही ३२ रुपये देतो. त्यांच्यावर बंदी घालून स्पर्धा थांबवायची का? त्यांच्यावर बंदी घालता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.