लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) कोल्हापूर केंद्रामार्फत कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय सेवा तसेच अन्न, जीवनावश्यक सामग्री संच, तसेच पशुखाद्य व औषधांचे वितरण करण्यात आले असून, यावर्षीची श्री कृष्ण जन्माष्टमीही साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय इस्कॉनने घेतला आहे.इस्कॉनमार्फत कागल, शिरोळ, गारगोटी इत्यादी पूरग्रस्त परिसरामध्ये वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली. त्या ठिकाणी तीन हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधांचे वितरण करण्यात आले. इस्कॉनच्या कोल्हापूर केंद्राला मुंबईच्या भक्तिवेदांत हॉस्पिटल, तसेच जनकल्याण समितीचे सहकार्य लाभले.पहिल्या टप्प्यात १०८ कुटुंबीयांना २८ जीवनावश्यक वस्तूंचे संच पोहोचविण्यात आले. याशिवाय शेकडो गरजू पूरग्रस्त बांधवांपर्यंतही जेवण पोहोचविण्यात आले. ग्रामीण भागातील गुरांकरिता कोरडी वैरण उपलब्ध करून तीही पोहोचविण्यात आली. वैद्यकीय सेवेसाठी डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. गुजर, डॉ. अमित भोसले, डॉ. प्रफुल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले, तर जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी संस्थेच्या सर्व साधकांनी सहकार्य केले.-----------------------------------------फोटो : २00८२0१९-कोल-इस्कॉनफोटो ओळ : इस्कॉन संस्थेमार्फत कोल्हापुरातील पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत देण्यात आली.(संदीप आडनाईक)