गडहिंग्लज :गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का ? असा सवाल विचारतानाच कोल्हापूर शहराप्रमाणे गडहिंग्लज शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. प्रांतकचेरीचे नायब तहसिलदार जीवन क्षीरसागर यांनी निवेदन स्विकारले.निवेदनात म्हटले आहे, गेल्या तीन महिन्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. कर्जाचे हप्ते, भांडवल, वीज बील, कामगारांचे पगार, जागाभाडे यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.आजपर्यंत गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाला खूप सहकार्य केले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्याची दक्षता घेतली जाईल, अशी हमी निवेदनातून देण्यात आली आहे.शिष्टमंडळात, कार्याध्यक्ष राजेश बोरगावे, संजय खोत, श्रीनिवास वेर्णेकर, रामदास कुराडे, प्रविण पावले, युनूस नाईकवाडे, अरूण जाधव आदींसह सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का ?, व्यापाऱ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 3:04 PM
CoronaVirus Gadhingalaj PrantOffice Kolhapur :गडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का ? असा सवाल विचारतानाच कोल्हापूर शहराप्रमाणे गडहिंग्लज शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. प्रांतकचेरीचे नायब तहसिलदार जीवन क्षीरसागर यांनी निवेदन स्विकारले.
ठळक मुद्देगडहिंग्लज शहर कोल्हापूर जिल्ह्यात नाही का ?, व्यापाऱ्यांचा सवालचेंबर आॅफ कॉमर्सतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन