शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

इस्पुर्ली आरोग्य केंद्र म्हणजे रुग्णांसाठी ‘माझा दवाखाना’

By admin | Published: February 29, 2016 12:39 AM

सेवा-सुविधांनी सज्ज : अठरा गावांतील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी, लोकवर्गणीतून परिसराचा कायापालट

सागर शिंदे -- दिंडनेर्ली -इच्छितो नच मी राज्य स्वर्गाचे, ना स्वर्ग ना पुनर्भव। इच्छा एकच मनी माझ्या आर्तांचे दु:ख नाशन। या सुभाषिताप्रमाणेच सरकारी दवाखाना ही संकल्पना बाजूला ठेवत इस्पुर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे ‘माझा दवाखाना’ही भावना कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक यांच्या अंतर्मनावर ठसवण्यात येथील वैद्यकीय अधिकारी उषादेवी डी. कुंभार व कर्मचारी यशस्वी ठरले आहेत. या केंद्रास आरोग्यमंत्री दीपक सावंत, ‘यशदा’चे संचालक चहांदे यांनी भेट देऊन कौतुक केले आहे.राज्य शासनाची कायापालट योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप दिव्ये पार पाडावी लागणाार होती. त्यामुळे दैनंदिन सेवा बजावत ‘माझा दवाखाना’ या भावनेतूनच प्रत्येक कार्य पार पाडले आहे. त्यामुळेच हा कायापालट करीत राष्ट्रीय मानांकनासाठी मजल मारली आहे. इस्पुर्ली केंद्रांअंतर्गत एकूण १७ गावे व सात उपकेंद्रे येतात. वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण १४ कर्मचारी कार्यरत असून, एक १0८ व एक १0२ अशा दोन रुग्णवाहिका तत्पर आहेत.या आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरुग्ण विभाग व अंतर्गत रुग्ण विभाग आहेत. वैद्यकीय अधिकारी कक्ष, औषध निर्मात कक्ष, मिटिंग हॉल, कार्यालय कक्ष, आरोग्य सहायक, स्त्री कक्ष, आरोग्य सहायक पुरुष कक्ष, स्टोअर रूम, पुरुष व महिला असे दोन वॉर्ड, डिलिव्हरी रूम, शस्त्रक्रियागृह, धर्मशाळा, आदी स्वतंत्र अद्ययावत विभाग चालू आहेत. रुग्णांना व नातेवाइकांना प्रतीक्षा करण्यासाठी सुसज्ज प्रतीक्षा कक्ष आहे. मनोरंजनासाठी एलईडी टीव्ही, वर्तमानपत्रे, मासिके आहेत. टोकण सुविधा असल्याने पेशंटही गोंधळ, गडबड न करता नंबराप्रमाणे लाभ घेतात. स्तनपानासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष आहे. के ंद्रात २४ तास लाईट, पाणी उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्यासाठी शुद्धिकरण उपकरणे बसविण्यात आली आहेत. शौचालय, बाथरूम तसेच रुग्णांना अंघोळीसाठी सोलर गरम पाण्याची सोय २४ तास उपलब्ध आहे. स्त्रियांना प्रसूतीनंतर मोफत आहार वाटप योजना कार्यान्वित आहे. सुसज्ज प्रयोगशाळ आहे. येथील एका पुरुष कर्मचाऱ्याने स्वत: नसबंदी करून इतरांचेही प्रबोधन केले आहे. प्रत्येक वॉर्ड, लसीकरण कक्षामध्ये माहिती व सूचना फलक लावले असल्याने रुग्णांना व नातेवाइकांना याचा खूप फायदा होत आहे. या उपकेंद्राद्वारे कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य लसीकरण व सर्व्हे करण्याची मोहीम राबविली जाते. आरोग्य कें द्रात जैविक कचरा, घनकचरा यांचे वर्गीकरण करून कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले आहे. कंपोस्ट खत, गप्पी मासे पैदास केंद्र, रेन हार्वेस्टिंग केले आहे. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज निवासस्थाने आहेत. महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून प्रयोगशाळेची इमारत व लॉन तयार केले आहे. मुलांना खेळण्यासाठी चिल्डे्रन पार्क आहे. पार्कच्या बाजूला संंगमरवरी गणपती मंदिर असून, तेथे कारंजा आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये प्रसन्न वातावरण असते. ठळक वैशिष्ट्ये लोकवर्गणीतून ३.५0 लाख रुपयांची मदतस्तनपानासाठी स्वतंत्र हिरकणी कक्षसुसज्ज प्रयोगशाळापरिसरामध्ये गणपती मंदिर, लॉन, रेन बसेरा तसेच नातेवाइकांसाठी धर्मशाळा व लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्डे्रन पार्क कर्मचारी, पेशंट व नातेवाइकांमध्ये संपर्कासाठी पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम पूर्ण केंद्रासाठी पूर्णवेळ सौरऊर्जेचा वापरकर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श कर्मचाऱ्याला दर महिन्याला ‘एम्प्लॉय आॅफ द मंथ’ पुरस्कारफ क्त नोकरी, कर्तव्य न मानता जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ‘माझा दवाखाना’ ही संकल्पना माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मनात दृढ केली. केवळ मानांकनासाठी नाही, तर येथून पुढे ही अशीच सेवा सुरू राहील.- उषादेवी डी. कुंभार, वैद्यकीय अधिकारी