संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गावातील मूलभूत प्रश्न, विकासाचे मुद्दे, प्रभागातील रस्ते व नाल्याचा प्रश्न, अर्धवट कामे पूर्ण करणे, गावाचा विकास अशा विविध मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारयंत्रणा राबवित आहेत. शिरोळ तालुक्यातील चौदा गावांत प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ४९ उमेदवार सरपंचपदाचे भवितव्य आजमावत आहेत. थेट सरपंचपदामुळे गावातील सरपंचाला महत्त्व आले असले तरी आघाड्यातून लढणाºया उमेदवाराला कसरत करावी लागत आहे.
शिरोळ तालुक्यातील औरवाड, कवठेसार, कनवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड व खिद्रापूर या चौदा गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची चुरस वाढली आहे. सोयीप्रमाणे नेत्यांनी आघाड्या केल्या आहेत. दरम्यान, प्रथमच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. खुल्या गटातील सरपंच पदामुळे उमेदवारांत ईर्ष्या वाढली आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत विविध विकासकामांच्या मुद्यावर भर दिला जात आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे कच्चे दुवे पाहून प्रचार करीत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुका नेत्यांचाही प्रचार दौरा सुरू आहे.मतदारांची दिवाळीथेट नगराध्यक्ष पदानंतर थेट सरपंच निवडणुका होत आहेत. नगरपालिका निवडणुकीत आघाडीतील उमेदवारांच्या बळावर नगराध्यक्ष निवडून आल्याचे दिसून येत आहे.तीच परिस्थिती ग्रामपंचायत निवडणुकीत दिसत असली तरी सरपंचपदाच्या उमेदवाराला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.प्रचार करताना संपूर्ण गाव पिंजून काढावा लागत असून, आघाडीतील उमेदवारांनाही रसद पुरवावी लागत आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबर मतदारांचीही दिवाळी सुरू आहे.