निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील ऐनापूर, बेळगुंदी, गिजवणे, भडगाव, जरळी, दुंडगे, औरनाळ, हेब्बाळ क॥नूल, याठिकाणी मदत केंद्र सुरू आहे. केंद्रातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधे वाटप, समुपदेशन, रुग्णांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व उपचार आदी कार्य केले जाते.
याकामी केंद्रचालकांना आवश्यकतेनुसार तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना लॉकडाऊनमध्ये आरोग्य व अत्यावश्यक सेवा श्रेणीखाली प्रवास परवाने द्यावेत.
निवेदनावर संघटनेचे मदन देशपांडे, सुनील कराळे, अरविंद कणसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.