शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

अपक्षांची डाळ शिजणे अवघड

By admin | Published: October 27, 2015 11:40 PM

अवघ्या दहा प्रभागांत आव्हान : दोन ते तीन अपक्ष विजयी होण्याची शक्यता

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत २००५ सालापर्यंत अपक्ष नगरसेवकांचा झालेला उन्माद पाहता गेल्या दहा वर्षांत शहरातील मतदारांनी पक्षीय राजकारण स्वीकारले असून अपक्षांना झिडकारले आहे. त्याचीच पुनरावृत्ती यावेळच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल. यंदाच्या निवडणुकीत दहा प्रभागांत अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे केले असले, तरी प्रत्यक्षात दोन किंवा तीन उमेदवार निवडून येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांची ‘डाळ’ शिजणार नाही, हे स्पष्ट आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक १९७८ मध्ये झाली, तेव्हापासून २००५ पर्यंत कॉँग्रेस पक्षांतर्गत गट-तट यांच्यामध्येच ही निवडणूक लढली गेली. त्यामुळे पहिल्या पाच सार्वत्रिक निवडणुकीत अपक्षांचेच वर्चस्व राहिले. १९९० च्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत ताराराणी आघाडीने महापालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्याचे नेतृत्व आमदार महादेवराव महाडिक यांनी केले. काँग्रेसचे अनेक सक्रिय कार्यकर्ते महाडिकांच्या मांडवाखालूनच पदाधिकारी झाले. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार महाडिक यांनीच महापालिकेची सत्ता काबीज केली; परंतु बहुमत काठावरचे मिळाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाने मोट बांधली. त्यांनीही महाडिक यांच्याच राजकारणाचे अनुकरण केले. पुढे एक वर्षात तर महाडिक गटाच्या तत्कालीन महापौर सई खराडे यांनाच फोडण्यात राष्ट्रवादी व जनसुराज्यने यश मिळविले. त्यांच्यासह सात-आठ नगरसेवकसुद्धा ताराराणी आघाडीतून बाहेर पडले. सत्ता राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाच्या हाती राहिली. त्यानंतर २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य आघाडीबरोबर काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे स्वाभाविक या तीन पक्षांनी मोट बांधून महाडिक यांच्या राजकारणाला पहिल्यांदाच निर्विवाद ‘ब्रेक’ दिला. त्यावेळी फक्त दहा अपक्ष उमेदवार विजय झाले होते. बसुगडे, आडसुळे लढतात अपक्ष माजी नगरसेवक संभाजी बसुगडे हे आमदार महाडिक यांचे समर्थक आहेत. त्यांनी रंकाळा स्टॅँड प्रभागातून ताराराणी आघाडीकडे उमेदवारी मागितली होती; परंतु कारभाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांची उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे बसुगडे यांना प्रभाग बदलावा लागला. शेवटी त्यांनी दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून लढण्याची तयारी करावी लागली. पांडुरंग आडसुळे हे गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढले होते. यंदा त्यांचा प्रभाग तोडला गेल्यामुळे त्यांनी नाथा गोळे प्रभागाकडे मोर्चा वळवला; परंतु त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अन्य प्रभागांत माजी नगरसेविका प्रेमा डवरी (प्रभाग : ३५), राहुल शिवाजी खाडे (प्रभाग : ५२), रवींद्र मुतगी (प्रभाग : ६४), राजेंद्र दिंडोर्ले (प्रभाग : ७५) यांनी राजकीय पक्षांसमोर आव्हान निर्माण केले आहे. १२४ अपक्ष उमेदवार रिंगणात : पक्षीय राजकारणाचे वर्चस्वयंदाही पक्षीय राजकारणाचेच वर्चस्व राहील असे चित्र आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेबरोबरच आता भाजपही मोठ्या ताकदीने ताराराणी आघाडीसह निवडणूक रिंगणात उतरली आहे. निवडणूक लढविणाऱ्या सर्वच प्रमुख पक्षांचा उमेदवारांना चांगला आधार व पर्याय मिळाल्यामुळे यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या घटली आहे. राजकीय पक्षांची सर्व प्रकारची मदत मिळते असा अनुभव आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी थेट माघार घेतली. या निवडणुकीत ५०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये १२४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तीन प्रभागांत शिवसैनिकांची बंडखोरी यंदा शिवसेनेत उमेदवारीचा घोळ बराच उशिरापर्यंत सुरू राहिला. शिवसेनेत ‘कट्टर शिवसैनिक’ म्हणून ज्यांचा उल्लेख करण्यात येतो, अशा दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, अभिषेक देवणे, शशिकांत बिडकर, राजेंद्र जाधव यांना ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले होते. त्यातील देवणे व टिपुगडे वगळता अन्य शिवसैनिकांची उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षीय गटबाजीतून हे घडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे उमेदवारी नाकारलेल्या कमलाकर जगदाळे यांनी त्यांची पत्नी शुभदा जगदाळे (प्रभाग क्रमांक ४२), शशिकांत बिडकर (प्रभाग क्रमांक १४), तर राजेंद्र जाधव (प्रभाग क्रमांक ४८) यांना थेट बंडखोरी करावी लागली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये दोघांची बंडखोरीकॉँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या नीलोफर आजरेकर (प्रभाग क्रमांक २६) व राजू बजरंग पसारे (प्रभाग क्रमांक ३९) यांनी बंडखोरी केली आहे. आजरेकर यांना माजी मंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला; परंतु जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे या दोघांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत. नीलोफर आजरेकर यांच्या प्रचाराला मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यांचे मोठे आव्हान इतर पक्षांच्या उमेदवारांसमोर आहे.