शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

जुना राजवाडा वास्तूचा चुकीचा इतिहास मांडणे क्लेशदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 12:58 PM

Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur-ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला जुना राजवाडा या वास्तूचा इतिहास संकेतस्थळावर चुकीच्या पद्धतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे, अशा शब्दात खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या मूर्तिमंत वैभवशाली इतिहासाचे अयोेग्य पद्धतीने होत असलेल्या या सादरीकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून पर्यटनस्थळांची दिलेली माहिती पडताळून पाहावी, असा सल्लाही दिला आहे.

ठळक मुद्देखासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केली नाराजी पर्यटनस्थळांची माहीत पडताळून पाहण्याचा दिला सल्ला

कोल्हापूर : ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला जुना राजवाडा या वास्तूचा इतिहास संकेतस्थळावर चुकीच्या पद्धतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे, अशा शब्दात खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या मूर्तिमंत वैभवशाली इतिहासाचे अयोेग्य पद्धतीने होत असलेल्या या सादरीकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून पर्यटनस्थळांची दिलेली माहिती पडताळून पाहावी, असा सल्लाही दिला आहे.कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या कोल्हापूर डॉट गर्व्ह डॉट इन या संकेतस्थळावर जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती दिली आहे. या अंबाबाई मंदिरासह भवानी मंडप व जुना राजवाडा विषयी चुकीची माहिती दिल्याचे लोकमतने रविवारच्या अंकात उघडकीस आणले. याची दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पत्र काढून यात लक्ष घालण्याची आणि चुकीचा इतिहास पसरू नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

पत्रात संभाजीराजे म्हणतात, पर्यटनस्थळांची माहिती व इतिहास माहीत व्हावा हा संकेतस्थळ विकसित करण्यामागील हेतू चांगला आहे, पण सत्यतेची पडताळणी न करता माहिती अपलोड करणे म्हणजे पर्यटकांची दिशाभूल आणि चुकीचा इतिहास पुढे रेटण्यासारखे आहे.भवानी मंडप हा जुना राजवाडा या ऐतिहासिक वास्तूचा एक भाग मात्र आहे, जो राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कन्या आक्कासाहेब महाराज यांच्या विवाहाप्रित्यर्थ जुन्या राजवाड्याच्या मुख्य वास्तुसमोर १९०८ मध्ये बांधला. हा खरा इतिहास असताना तो सदाखान यांनी बांधला असा संकेतस्थळावर चुकीचा उल्लेख केला असल्याचेही संभाजीराजे यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले.

जुन्या राजवाड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे असल्याचा उल्लेखही अत्यंत बेजबाबदारपणे केले आहे. या राजवाड्यात तुळजाभवानी देवीचे मंदिर असल्याचे सांगितले आहे, पण ते मंदिर नसून छत्रपती घराण्याचे देवघर आहे, त्यास अंबा देवघर म्हटले जाते, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.करवीर राज्याचा राज्यकारभार जिथून चालला, १८५७ च्या क्रांतिकारक उठावाची सूत्रे चिमासाहेब महाराजांनी जिथून सांभाळली, राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला त्या ऐतिहासिक क्षणाच्या भवानी मंडपाविषयी चुकीचा इतिहास पसरवणे हे अतिशय बेजबाबदार आणि वेदनादायी कृत्य आहे. तो हटवून जुन्या राजवाड्यासह पन्हाळगड, अंबाबाई मंदिर, इतर ऐतिहासिक पर्यटनस्थळांची माहिती याक्षेत्रातील तज्ज्ञांकडून पडताळून घेतल्याशिवाय अपलोड करू नये, योग्य माहितीसह संदर्भपूर्ण इतिहास संकेतस्थळावर प्रकाशित करावा, असे आवाहनही केले आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीtourismपर्यटनkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी