शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Kolhapur: चित्रपट महामंडळ निवडणुकीचा खेळखंडोबा, मार्ग काढण्याची गरज

By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 30, 2024 6:10 PM

मतदानासाठी पात्र सभासद किती?

इंदुमती गणेशकोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सत्ताधारी व विरोधी गट एकमेकांविरोधात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेल्याने मराठी चित्रपटसृष्टीचा मानबिंदू असलेल्या या शिखर संस्थेचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. आपल्यामुळे हजारो चित्रपट व्यावसायिक, कामगार, तंत्रज्ञ वेठीस धरले गेले आहेत, धोरणात्मक निर्णय घेता येत नाही, कामकाज ठप्प झाले आहे, बरं यातून मार्ग काढला पाहिजे, असे जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनाही वाटत नाही, यासारखे दुर्दैव नाही.

चित्रपट महामंडळाची मुदत संपून अडीच वर्षे झाली आहेत. या कार्यकारिणीतील अंतर्गत राजकारणामुळे आजवर निवडणूक होऊ शकली नाही. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे निवडणूक लावली. अखेर धर्मादायने निवडणूक जाहीर केली, तर सभासदांच्या पात्रतेच्या मुद्यावरून ही प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे आता महामंडळातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. मतदानासाठी पात्र सभासद किती?निवडणुकीची मतदारयादी प्रसिद्ध झाल्यावर विरोधी गटाने ‘अ’ वर्ग सभासदांच्या मुद्यावरून हरकती नोंदवल्या. मतदानासाठी पात्र सभासदांची संख्या ६ हजारांवरून थेट ३ हजारांवर आली. प्रत्यक्षात महामंडळाचे ४५ हजार सभासद आहेत. मग मतदानासाठी नेमके पात्र सभासद किती यावरून वाद सुरू आहे.

धर्मादाय, उच्च न्यायालय की सर्वोच्च न्यायालयपात्र सभासद संख्येवरून अध्यक्षांचा दावा उच्च न्यायालयात सुरू आहे, तर विरोधी गटाने थेट सर्वोच्च न्यायालयातच दावा केला आहे. तिथे अजून सुनावणीची तारीखच लागलेली नाही. प्रकरण रेंगाळत पडले आहे. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दावे प्रलंबित असल्याने धर्मादायला निर्णय घेता येत नाही, असे हे त्रांगडे होऊन बसले आहे.

चहा बंद कराधर्मादायच्या निरीक्षकांनी चित्रपट महामंडळाच्या घटनेत चहाचे बिल देण्याची तरतूद नाही. त्यामुळे चहा बंद करा, असा फतवा काढला आहे. त्यामुळे चहासुद्धा बंद झाला आहे. अध्यक्ष स्वत:च्या पातळीवर मार्ग काढत आहेत. मुळातच पगार कमी, त्यात अशी अवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडायला सुरुवात केली आहे.

बेजबाबदार लोकांच्या तक्रारींमुळे महामंडळावर ही वेळ आली आहे. आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही, हे मान्य आहे; पण धर्मादायमधून नियुक्त निरीक्षकांनी वस्तुस्थिती, बिले तपासून दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांच्या पगाराला परवानगी दिली पाहिजे. सणासुदीच्या काळात अशा पद्धतीने अडवणूक होत असल्याने कामकाज करण्यात अडचणी येत आहेत. -मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 

महामंडळाकडून केल्या गेलेल्या वारेमाप खर्चामुळे मी या कारभाराविरोधात तक्रार केली आहे. संचालकांनी आजवर रीतसर हिशोब मांडलेला नाही म्हणून ही बंधने आली आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारासह दैनंदिन खर्च निरीक्षकांच्या सहीने केले जाण्यास आक्षेप नाही. -बाबा लाड, तक्रारदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूर