मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा वडिलांना शब्द दिला होता असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता का, अशी विचारणा करीत मी बघितलेले उद्धव ठाकरे हे नव्हेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.देवेंद्र फडणवीस; राज्य सरकारने कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाकोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबत शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकºयांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही. तसेच सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधकांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत केली. एका विवाह समारंभाच्या निमित्ताने फडणवीस रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करतो अशी घोषणा करणाºयांनी ‘यू टर्न’ घेतला आहे.
आज अवकाळीग्रस्त शेतकºयांना कर्जमाफीची गरज असताना त्यांना ती दिली गेली नाही. सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत घातल्याने अनेकजण यापासून वंचित राहणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सर्व बाबींविरोधात भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत राजकारणातून समाज विघटन करण्यासाठी अफवा पसरविल्या जात आहेत. भारताशेजारील पाकिस्तान, बांगला देश यासारख्या देशांनी जर अल्पसंख्याकांवर धार्मिकदृष्ट्या अन्याय केला तर त्यांना भारतामध्ये आश्रय देण्याबाबतचा करार याआधीच अनेक वर्षांपूर्वी झाला आहे. या कायद्याच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.भीमा कोरेगावबाबत केलेली कारवाई ही पुराव्यांवर आधारित होती. न्यायालयानेही हे मान्य केले आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.महाडिक बंधू भाजपमध्येसांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांत ताकद असलेल्या सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक बंधूंनी सोमवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे सम्राट हे चिरंजीव असून, ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.