शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

जिल्ह्यात दिवसभर उघडीप़ तर काही ठिकाणी नुसतीच भुरभुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:28 PM

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. मात्र, काही ठिकाणी अधूनमधून पावसाची नुसतीच भुरभुर होती. मान्सून गतीने महाराष्ट्राकडे आगेकूच करू लागल्याने वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दिवसभर उघडीप़ तर काही ठिकाणी नुसतीच भुरभुर वातावरणात काहीसा बदल

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. मात्र, काही ठिकाणी अधूनमधून पावसाची नुसतीच भुरभुर होती. मान्सून गतीने महाराष्ट्राकडे आगेकूच करू लागल्याने वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे.जूनचा पहिला आठवडा संपल्याने आता सगळ्यांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. गेल्या दोन वर्षातील अनुभव पाहता मान्सूनने वेळेवर हजेरी लावली होती. जूनच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात तो काहीसा गायब होतो. मात्र, सुरुवात दमदार करतो.

यामुळे खरिपाची उगवण होऊन पिकांच्या आंतरमशागतीला शेतकऱ्यांना वेळ मिळतो. यंदा निसर्ग चक्रीवादळाने जूनचा पहिला आठवडा गेला. दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मान्सून कर्नाटकात आला असून त्याचा वेग चांगला असल्याने तो बुधवारपर्यंत महाराष्ट्रात धडक मारेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

चंदगडमध्ये काल 2.83 मिमी पाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरात  चंदगड तालुक्यात 2.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात शाहुवाडी तालुक्यात 2.50 मिमी पावसाची नोंद झाली असून इतर सर्व ठिकाणी पाऊस निरंक आहे.

धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठातुळशी 45.44 दलघमी, वारणा 330.93 दलघमी, दूधगंगा 208.78 दलघमी, कासारी 24.70 दलघमी, कडवी 30.35 दलघमी, कुंभी 27.30 दलघमी, पाटगाव 24.27 दलघमी, चिकोत्रा 13.93 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 7.43 दलघमी, घटप्रभा  12.70 दलघमी, जांबरे 5.79 दलघमी, कोदे (ल पा) 0.99 दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे राजाराम 11.2 फूट, सुर्वे 11.6 फूट, रुई 39 फूट, तेरवाड 34 फूट, शिरोळ 27.6 फूट, नृसिंहवाडी 23 फूट, राजापूर 12 फूट तर नजीकच्या सांगली 5.6 फूट व अंकली 8.6  फूट अशी आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर