शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

‘ह्याला गाड... त्याला गाड’चे राजकारण

By admin | Published: April 23, 2015 12:53 AM

‘गोकुळ’च्या दुधाला उकळी : क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने सत्तारूढ गटाला चिंता _- गोकुळ निवडणूक

राजाराम लोंढे -कोल्हापूर शेवटच्या टप्प्यात ‘गोकुळ’च्या दुधाला चांगलीच उकळी आली असून, विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यातूनच ‘ह्याला गाड... त्याला गाड’च्या राजकारणाने जोर धरला आहे. राधानगरी, भुदरगड, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांत याची लागण झाल्याने ‘क्रॉस व्होटिंग’ मोठ्या प्रमाणात होणार आहे. या धसक्याने सत्तारूढ गट चिंतेत आहे. ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ राजर्षी शाहू पॅनेल व राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलमध्ये सामना होत आहे. ठराव गोळा करण्यापासून सत्तारूढ गटाने निवडणुकीवर आपली पकड घट्ट केली होती. इच्छुकांची संख्या सत्तारूढ गटाकडे जास्त होती; त्यामुळे पॅनेलची बांधणी करताना नेत्यांची पुरती दमछाक झाली. दोन चेहरे वगळता जुन्यांनाच संधी दिल्याने सत्तारूढ गटावर नाराजी ओढवली. अनेकांनी उघड, तर काहींनी छुपा विरोध केला आहे. जुन्या संचालकांकडे एकगठ्ठा मतदान असले तरी त्यांच्या कारभारावर नाराजही तितकेच आहेत. त्यामुळे सत्तारूढला निवडणूक सोपी नाही. राजकीय अपरिहार्यता म्हणून दोन्ही पॅनेलमधील काही मंडळी एकत्र आली आहेत. विधानसभा, साखर कारखाने निवडणुकीतील वार ताजे असल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील जखमा अजूनही भळभळत आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी कितीही दावे-प्रतिदावे केले तरी क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात होणार, हे निश्चित आहे. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत आपली सोय पाहूनच मतदान होणार आहे. कोणाला गाडायचे, कोणाला पाडायचे याची यादीच ठरावधारकांना देण्यात आली आहे. एका नेत्याने सत्तारूढ पॅनेलमधील दोन महिला, दोन विद्यमान संचालकांना मतदान करण्याचे थेट आदेश दिले आहेत; तर दुसऱ्या नेत्याने एक वगळूनच मतदान करा, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. एका ज्येष्ठ नेत्यांनी ‘सहा माजी अध्यक्षांना पहिले धरा आणि बाकी काय करायचे ते करा,’ असे सांगितले आहे. विरोधी पॅनेलमध्येही असेच सोयीचे राजकारण सुरू आहे. विधानसभेला मदत केलेल्या नेत्यांच्या उमेदवारांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आपला शब्द मानणाऱ्या इतर नेत्यांमार्फत आपल्या विरोधकांचा पत्ता कापण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. विधानसभेतील पाडापाडीच्या राजकारणाचे धुमारे अजूनही विझलेले नाहीत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत या धुमाऱ्यांनी अधिक पेट घेतल्याने मातब्बर उमेदवारांना त्याचे चटके सोसावे लागणार आहेत. त्यामुळे क्रॉस व्होटिंगचा धसका सत्तारूढ गटातील उमेदवारांनी घेतला आहे. एका मतासाठी ‘लाख’मोलाच्या तडजोडी शेवटच्या टप्प्यात मतांची कागदावरील गोळाबेरीज जोरात सुरू होती. यामध्ये किती उचलले, आपल्याला कोणाचे मत मिळेल, पॅनेलला नसले तरी आपणाला एक मत मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. काठावरील एक-एक मत खेचण्यासाठी शेवटचे दोन दिवस ‘लाख’मोलाच्या तडजोडी झाल्या. शपथही वगळूनच!दोन्ही गटांकडून काही ठरावधारकांना सहलीवर पाठविलेले आहे; तर उर्वरित अर्थपूर्ण घडामोडीही जोरात सुरू आहेत. पॅनेल टू पॅनेल मतदानाची शपथ देताना ठरावधारक ‘त्या’ उमेदवारांना वगळूनच मनातल्या मनात शपथ घेत आहेत.