शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

रात्रभर पावसाने झोडपले, राधानगरीचे चार दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 7:50 PM

Rain Kolhapur : मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून, त्यातून ७ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाला.

ठळक मुद्देरात्रभर पावसाने झोडपले राधानगरीचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : क्षणात येती सर सर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे या खास श्रावण सरींसाठीचे काव्य वर्णन कोल्हापुरात चक्क आषाढात अनुभूतीस येत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून, त्यातून ७ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाला. त्यामुळे ओसरू लागलेला पूर पुन्हा चढू लागला आहे. धरणांच्या पाणलोटसह गगनबावड्यातही अतिवृष्टी झाली आहे.चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. ऊनही पडत असल्याने महापुरातून जनता सावरत होती. त्यातच सोमवारपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. नुसत्याच भुरभुरणाऱ्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर मात्र संपूर्ण जिल्हाभर चांगलाच जोर धरला.

रात्री तर मुसळधार सरींनी मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाच्या आठवणी ताज्या केल्या. पाऊस कमी झाल्याने राधानगरी धरणातून केवळ विद्युत विमोचकासाठीचाच १४०० क्युसेक विसर्ग सुरू होता; पण मंगळवारी रात्री झालेल्या या पावसाने बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पाच मिनिटांच्या फरकाने ६ आणि ३ नंबरचा स्वयंचलित दरवाजात उघडला. त्यातून ४ हजार २५६ क्युसेक विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाला.

दुपारी चारच्या सुमारास ५ आणि ४ क्रमांकाचे दोन दरवाजे उघडल्याने पात्रातील विसर्ग ७ हजार क्युसेकवर पोहोचला. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २२ फूट १० इंचांवर होती.नद्यांच्या पाणीपातळीत वाढपाऊस कमी झाल्याने पात्राकडे नद्या येत होत्या; पण मंगळवारपासून पावसाने जोर धरल्याने पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, वारणेसह सर्व नद्या अजूनही पात्राच्या बाहेरूनच वाहत असून पाणीपातळी वाढत असल्याने नदीकाठानजीक पूरस्थिती कायम आहे.पाणलोटसह गगनबावड्यात अतिवृष्टीजिल्ह्यात बुधवारी दुपारी १२ पर्यंत आलेल्या अहवालानुसार धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात अतिवृष्टी झाली आहे. सर्व धरणांच्या पाणलोटात सरासरी ३० ते १६६ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे, तर तालुक्यामध्ये सर्वाधिक ७० मि.मी. पाऊस गगनबावड्यात झाला आहे. राधानगरी ३२, भुदरगड २८, चंदगड २४, करवीर २३, आजरा व पन्हाळा १८, कागल १७, गडहिंग्लज ९, हातकणंगले ७, शिरोळ ५ मि.मी. असा पाऊस पर्जन्यमापकावर नोंदविला गेला आहे.अजूनही १९ बंधारे पाण्याखालीपंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळभोगावती : हळदी, सरकारी कोगे, खडक कोगेवारणा: चिंचोली, माणगाव, खोचीकासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवेदूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सिद्धनेर्ली

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर