कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शिरोळ, शाहूवाडी, कागल व करवीर तालुक्यांच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. शहरात मात्र, दुपारी सरी पडल्याने गारवा निर्माण झाला. शेतकरी मात्र या पावसाने सुखावला आहे. प्रथमच दुष्काळी झळा सोसाव्या लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. गुरुवारी दुपारपर्यंत आभाळ स्वच्छ होते. सूर्य तळपत होता. दुपारनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी आकाशात ढग जमू लागले अन् वादळी पाऊस सुरू झाला. कोल्हापुरात चारच्या सुमारास दक्षिणेकडील भागात चांगला पाऊस झाला. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. यंदाच्या या पहिल्या पावसात अनेकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. शहरात अचानक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली. यातच बिंदू चौक, लक्ष्मीपुरीतील काही विद्युत वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. यामुळे बिंदू चौक आणि लक्ष्मीपुरीचा संपूर्ण परिसर रात्री उशिरापर्यंत अंधारात होता.मोबाईलने केला ‘आरटीओ’चा घातकोल्हापूर : भुदरगड किल्ल्यावर कुटुंबासमवेत गेलेले कोल्हापूर प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रकाश पंढरीनाथ पाटील (वय ५५, सध्या रा. हिम्मतबहाद्दर परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर, मूळ गाव डोंगरगाव, ता. येवला, जि. नाशिक) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. वीज पडली त्यावेळी पाटील हे मोबाईलवर बोलत होते. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विजेमुळे प्रकाश पाटील यांच्याशेजारी असलेल्या त्यांच्या पत्नी चंद्रकला व मुलगी ऋतुजा या बाजूला फेकल्या गेल्या. त्यांना फारशी इजा झालेली नाही.
पाऊस आला रे...
By admin | Published: June 03, 2016 1:13 AM