शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
2
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
5
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
6
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
7
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
8
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
9
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
10
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
11
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
12
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
13
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
15
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
16
IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा
17
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
18
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
19
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
20
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, मंत्री हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:18 PM

इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांच्या बैठकीत दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. दूधगंगा काठावरील लोकभावनांचा उद्रेक पाहता इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे इचलकरंजी समन्वय समितीने सामंजस्याने कृष्णेतून पाण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूधगंगा नदीतील पाणीप्रश्नी महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भुदरगड, राधानगरी, करवीर, कागल, शिरोळ या पाच तालुक्यांतील आणि कर्नाटकच्या सीमाभागातील दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी काळमवाडी धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचीही प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे जनता अक्षरशः कासावीस झाली होती. त्यावेळी आणि परवा झालेल्या बैठकीतही अनेक संतप्त वक्त्यांनी रक्तपाताची भाषा केली. तेच वाक्य अनावधानाने माझ्याकडून गेले. हा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते.आतापर्यंत इचलकरंजीसाठी अनेक पाणी योजना झाल्या. कृष्णा नदीवरून मजरेवाडी येथून पाणी योजनाही झाली आहे. इचलकरंजीतील नागरिक आमचेच असून त्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजेच, पण ती योजना कृष्णा नदीतून मजरेवाडीवरूनच झाली पाहिजे.दूधगंगेतून यापूर्वी कार्यक्षेत्र सोडून अनेक गावांतील शेती पाणीपुरवठा संस्थांना पाणी दिले आहे. त्यातच धरणाच्या गळतीमुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने आमच्या जमिनी देऊन जमिनी जाऊनही आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार नाही ही तीव्र भावना दूधगंगा काठावरील गावांतील शेतकऱ्यांमध्ये आहे.इचलकरंजी पाणी योजनांचे सोशल ऑडिट करायाबाबत, आपण खा. संजय मंडलिक आणि राजेंद्र पाटील -यड्रावकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विनंती करणार आहोत. या योजने संदर्भात बैठक घेण्याआधी इचलकरंजी शहरासाठी झालेल्या सगळ्या योजनांचा आढावा घ्या. त्यांचे सोशल ऑडिट करा आणि मगच बैठक घ्या, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘मजरेवाडी’ योजनेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे घालूइचलकरंजीसाठी कृष्णा नदीवरून मजरेवाडी योजनेसाठी आणखी निधी लागल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून साकडे घालू. परंतु दूधगंगेकडे येण्याचे त्यांनी धाडस करू नये, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ