इचलकरंजी : शहरातील कचरा उठाव करणाऱ्या दहा ते बारा घंटागाड्यांचे स्पिकर बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना शिटी वाजवून घंटागाडी आली अशी आरोळी देत कचरा टाकण्यासाठी बोलवावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दवंडी दिल्याचा प्रकार त्या भागातील नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. याबाबत ताबडतोब उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
राज्यामध्ये श्रीमंत नगरपालिका म्हणून इचलकरंजी पालिकेची ओळख आहे. नगरपालिकेने साडेचार कोटी रुपयांमध्ये ६८ घंटागाड्या व दोन कॉम्पॅक्टर खरेदी केल्या. या घंटागाडीमार्फत शहरातील ६२ प्रभागांमधून घरोघरी फिरून कचरा उठाव केला जातो. तेथून तो कचरा मैलखड्डा कचरा डेपोमध्ये टाकला जातो.
दरम्यान, कचरा उठावाचा ठेका एका कंपनीस दिला आहे. यावेळी या घंटागाडी व कॉम्पॅक्टरच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च या कंपनीकडे देण्याचा ठराव केला आहे. मात्र, शहरातील ६८ घंटागाड्यांपैकी १० ते १२ गाड्यांचे स्पिकर खराब झाले आहेत. नवीन घेतलेल्या घंटागाड्या मक्तेदारास दिल्या होत्या. त्याचा देखभाल खर्च केला नसल्याने गेल्या महिन्याभरापासून बंद पडलेले स्पिकर सुरू झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
(फोटो ओळी)
०४१२२०२०-आयसीएच-०४
घंटागाडी आली अशी आरोळी देणारा कर्मचारी.