डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयाचा मे २०२१ मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या बी फार्मसी प्रथम सत्र परीक्षेचा निकाल ९८.१३ टक्के लागला आहे. त्यामध्ये श्रेया जेमिनिस (९२.७४), आषिश धुत्रे (९२.४१), कोमल चव्हाण (९०.८०) यांनी यश मिळविले. बी फार्मसी अभ्यासक्रम हा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून सुरू झाला असून, विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी यश संपादन केले आहे.
कोरोना काळामध्ये सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करून घेण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांनीही या संकट काळात चांगले प्रयत्न केले असून, महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रम तसेच अभ्यासक्रमेतर अनेक उपक्रम राबविले जातात. याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी होत असल्याचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम, उपाध्यक्षा अॅड. सोनाली मगदूम, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, बी. के. कोथळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
फोटो - १२०८२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम बी फार्मसी कॉलेजमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांच्यासह शिक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.