ठळक मुद्देमृत्यू संशयास्पद असल्याने अवशेष ‘डीएनए’साठी पाठविणार
लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी/जयसिंगपूर : वैभववाडी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील कोकिसरे दत्तनगर बंधाºयानजीकच्या जंगलमय भागात जयसिंगपूरच्या युवकाचा सांगाडा आढळला. सचिन नरेंद्र कारखानीस (वय २४, रा. १२ वी गल्ली) असे या त्याचे नाव असून तो त्वचारोगाने त्रस्त होता. मृत सचिन ८ मेपासून बेपत्ता होता. दरम्यान, सायंकाळी त्याचे नातेवाईक वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, सचिनचा मृत्यू संशयास्पद असल्याने अवशेष ‘डीएनए’साठी पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुहास नानचे या गुराख्याला हा सांगाडा आढळून आला. त्याबाबत त्याने पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, उपनिरीक्षक जयश्री भोमकर, सहायक उपनिरीक्षक दीपक वरवडेकर, सुनील राणे, सचिन सापते, सुशांत पुरळकर, ज्ञानेश्वर दळवी, आदी घटनास्थळी पोहोचले. मृताची काही हाडे सांगाड्यापासून विखुरली होती.सांगाड्याशेजारी सॅक आढळली. त्यामध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, जयसिंगपूर कॉलेजचे ओळखपत्र, बँक पासबुक आणि सिम नसलेला लावा कंपनीचा मोबाईल सापडला. त्यामुळे पोलिसांनी जयसिंगपूर येथे संपर्क साधला असता. सचिन कारखानीस ८ मेपासून बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. सचिनचे वडील बीएसएनएलमध्ये नोकरीला आहेत, तर आई शिक्षिका आहे. सचिन कारखानीस बी. कॉम झाला होता, तर मुक्त विद्यापीठातून एम. कॉम करीत होता. (पान १२ वर)वैभववाडीत जयसिंगपूरच्या युवकाचा सांगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:16 AM