शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आर्थिक व्यवहारातून जैन मुनींची हत्या, एसपी संजीव पाटीलांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 2:17 PM

पैसे परत मागितल्याने आपण स्वामीजींचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली

प्रकाश बेळगोजी

बेळगाव: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या हिरेकोडी आश्रमाचे आचार्य प. पु. श्री कामकुमार नंदी महाराज यांची आर्थिक व्यवहारातून रायबाग तालुक्यातील कटकभावी गावात हत्या झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिघांना अटक झाली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी दिली.पैसे परत मागितल्याने आपण स्वामीजींचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. स्वामीजी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार भक्तांनी केली होती. तपासादरम्यान आश्रमात कोण-कोण आले-गेले? याची चौकशी करण्यात आली. स्वामीजींना ओळखणाऱ्या एका व्यक्तीची आम्ही चौकशी केली असता स्वामींना आश्रमात मारून मृतदेह इतरत्र टाकल्याची माहिती त्याने दिली. मात्र त्या माहिती तफावत होती. आरोपीनी प्रारंभी स्वामीजींचा मृतदेह कट्टनभावी येथील एका निरुपयोगी विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यानुसार तपास केला असता त्या ठिकाणी मृतदेह आढळला नाही. त्यानंतर आरोपींनी आपला जबाब बदलताना स्वामीजींच्या मृतदेहाची नदीमध्ये विल्हेवाट लावल्याचे सांगितले. त्यानुसार सध्या मृतदेहाचा शोध घेतला जात असून याप्रकरणी व्यापक तपास मोहीम हाती घेऊन पुरावे गोळा केले जात आहेत, असेही जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी स्पष्ट केले. आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या 15 वर्षांपासून नंदीपर्वत, हिरेकोडी येथील जैन बस्तीमध्ये राहत होते. गेल्या बुधवारी आपण राहत असलेल्या खोलीत पिंची, कमंडल आणि मोबाईल सोडून ते बेपत्ता झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीbelgaonबेळगाव