जयसिंगपूर : शहरात धूमस्टाईलने वाहने फिरविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शिरोळ मार्गावर तसेच रेल्वे स्टेशन मार्गावर मोठ्या प्रमाणात अशा वाहनधारकांकडून भरधावपणे वाहने चालविली जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने अशा वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
वाहतूक बंद
जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाने जावे लागत आहे. या रस्त्यावर क्राँकिटीकरण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
महामार्गावर पुन्हा खड्डा
जयसिंगपूर : शहरातून जाणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नांदणीकडे वळण घेणाऱ्या रस्त्यावर पुन्हा खड्डा पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. महामार्ग असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते. तसेच रात्रीच्यावेळेस या खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
-
शिरोळमध्ये अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी
शिरोळ : शहरात अवैध दारू विक्रीसह अवैध धंदे पुन्हा सुरू झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. शिरोळमध्ये तर अवैध दारू अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असताना पोलिसांनी गांधारीची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
--
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरूच
जयसिंगपूर : शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कारवाईनंतरही कमी झालेली नाही. त्यामुळे येथील क्रांती चौकात पोलीस व नगरपालिका यांच्याकडून मास्क न वापरणाऱ्याविरुध्द कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोनामुळे पुन्हा भीतीचे वातावरण असताना काहीजण विनामास्क फिरत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.