अर्जुनवाड : हौसाबाई होमिओपॅथिक कॉलेज एन. एन. एस. विभागामार्फत प्लास्टिकचा वापर कमी व्हावा म्हणून शिरटी (ता. शिरोळ) येथे एक हजार कुटुंबांना काचेचे ग्लास पुरविण्यात आले. तसेच साखरेचा वापर कमी करावा, प्रत्येकी १०० ग्रॅम रसायनविरहित गूळ वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन दिगंबर लोहार यांनी केले. प्लास्टिकचा वापर कमी करावा यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी माहिती सांगून प्रबोधन करण्यात आले. यावेळी अरुण चौगुले, अनिता चौगुले, सागर पवार, राहुल सूर्यवंशी, आलम मुल्लानी, सुरेश कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------
‘जायंटस्’कडून शिबिर उत्साहात
जयसिंगपूर : महिला दिनाचे औचित्य साधून जायंटस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्यावतीने महिलांची आरोग्य तपासणी शिबिर जयसिंगपूर येथे घेण्यात आले. यावेळी डॉ. साजिद मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. स्वागत डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी केले. नलिनी देसाई, अनुराधा वेल्हाळ, शामला पाटील, श्रद्धा पाटील, सुशीला पुजारी, अरुणा गुंडे, अश्विनी नरुटे, मंजुश्री मोघे, गंगा ताशिलदार, आशा शहापूरे, अश्विनी पवार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
-----------------------