शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

‘जलयुक्त’साठी कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावे निश्चित

By admin | Published: April 12, 2017 4:29 PM

बैठकीत शिक्कामोर्तब : जादा गावे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांतदादा पाटील

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १२ : जलयुक्त शिवार योजनेसाठी २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील १८ गावांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत या गावांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यामध्ये आणखी जादा ३८ गावे वाढविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजयसिंह देशमुख, वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले आदींची होती.पाणलोट एकात्मिक योजनेतून ५० टक्के काम झालेली गावे व आमदारांनी सुचविलेल्या गावांचा समन्वय ठेवून २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी १८ गावांची निवड करण्यात आली आहे. यंदा ५६ गावे या योजनेसाठी घ्यावीत कारण यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो असे सुचविण्यात आल्याने. निवडण्यात आलेल्या १८ गावांसह आणखी ३८ गावे वाढवून २० कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी आणता येऊ शकतो. त्यामुळे यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करु असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये काही तक्रारी आहेत. परंतु त्या गंभीर स्वरुपाच्या नाहीत. तसेच २०१६-१७पर्यंत झालेल्या या योजनेतील कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात आली आहेत. तमदलगे (ता. हातकणंगले) येथील कामाबाबत तक्रारी होत्या. त्याची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये तथ्थ आढळले आहे. त्याप्रमाणे शासनाला अहवाल सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले.निवडलेली १८ गावेकरवीर-खाटांगळे, सादळे मादळेगगनबवडा-वेसरफभुदरगड-कोंडोशी, लोटेवाडीआजरा-आर्दाळहातकणंगले-अंबपवाडीशिरोळ-कोंडीग्रेपन्हाळा-पोहाळे तर्फ आळते, कुशिरे तर्फ ठाणेशाहुवाडी-आकुर्लेराधानगरी-पडळी, रामणवाडीकागल-मांगनूरगडहिंग्लज-तेगीनहाळ, कवळीकट्टीचंदगड-गुडवळे खालसा, मजरे कारवे