शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

जालन्याची घटना जालियनवालाबाग हत्याकांडासारखी, जनरल डायर शोधा; कोल्हापुरातील सकल मराठा समाज संतप्त

By पोपट केशव पवार | Published: September 04, 2023 12:56 PM

शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकरांना विचारला जाब

कोल्हापूर : सरकारच्या लेखी मराठा समाजाला काहीच किंमत राहिली नसून अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मराठा समाजावर झालेला लाठीचार्ज हा जालियनवालाबाग हत्याकांडसारखाच प्रकार आहे. सरकारने यातील मेजर जनरल डायरचा शोध घ्यावा, अशा शब्दांत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिक्षणमंत्री, तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर संताप व्यक्त केला. सकल मराठा समाजाने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री केसरकर यांना जालन्यातील घटनेचा जाब विचारत निषेध व्यक्त केला. मागण्यांचे निवेदनही केसरकर यांना दिले.बाबा इंदूलकर म्हणाले, जालन्यातील घटनेत पोलिसांनी समाजाच्या लोकांना जनावरासारखे मारले आहे. सरकारच्यालेखी मराठ्यांची किंमत उरली नसून मराठाद्वेषी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. ही घटना जालियनवालाबाग हत्याकांडासारखी आहे. त्यामुळे या घटनेतील मेजर जनरल डायर कोण आहे, याचा शोध घ्या. यावेळी बाबा पार्टे, अनिल घाटगे, महादेव पाटील, काका पाटील, सतीश नलवडे,अमरसिंह निंबाळकर उपस्थित होते.बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला - मंत्री केसरकरमराठा समाजाने याआधी शांततेत मोर्चे काढून जगभर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीत घडलेल्या घटनेत या समाजाचा हात नसून बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातल्याचा आरोप मंत्री केसरकर यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून त्यादृष्टीने पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणDeepak Kesarkarदीपक केसरकर