लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीला जलपर्णीने पूर्णपणे व्यापले होते. याबाबत पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक टीम व पालिकेच्यावतीने जलपर्णी हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहत आल्याने नदीघाटात जलपर्णीने विळखा घातला. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन त्याचा धोका जलचरांना होण्याची शक्यता आहे. याची दखल घेत दरवर्षीप्रमाणे यंदा पुन्हा जलपर्णी काढण्याची मोहीम भोसले यांची व्यंकोबा मैदान येथील पैलवानांची एक टीम जलपर्णी काढण्यात गुंतली होती. या मोहिमेत सकाळच्या सत्रात १५ डंपर जलपर्णी काढण्यात आली.
फोटो ओळी
२५०२२०२१-आयसीएच-०२
पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली होती. त्यामुळे नदीपात्राला क्रीडांगणाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
२५०२२०१-आयसीएच-०३
व्यंकोबा मैदानमधील पैलवान, वरदविनायक बोल्ट क्लब व पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी अमृत भोसले, डॉ. विजय माळी, शुभम कोरे, शुभम धुमाळ, संदेश आजगेकर यांच्यासह पैलवान व पालिका कर्मचारी उपस्थित होते.