व्हन्नूर : पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील एम. आर. चौगुले (गुरुजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त झालेल्या भव्य कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच्या अटीतटीच्या झालेल्या लढतीत गंगावेश तालमीचा पै. माऊली जमदाडे याने पै. कपिल सणगरला दुहेरी पट काढून अस्मान दाखवत कुस्ती मैदान जिंकले.यावेळी ग्रामीण भागात पहिल्यांदाच झालेल्या महिला कुस्तीमध्ये राजश्री घुणके, नेहा परीट या महिला कुस्तीगिरांनी प्रतिस्पर्धी महिला मल्लांवर विजय मिळवून उपस्थितांची वाहवा मिळविली. शुभांगी शिंदे व श्वेता भोजकर यांची कुस्ती बरोबरीत सोडविली.इतर विजयी मल्ल असे- मुकुंद वाडकर (व्हन्नाळी), अनिल चव्हाण (नांदगाव), सचिन वाघ (गंगावेश), प्रकाश नरुटे, राम कांबळे, तुषार शिंदे, ओंकार भाकमारे, गणेश गदारे, वैभव शेट्टी, बाळू पुजारी (प्र. आ. अॅकेडमी), नेताजी भोसले, सागर सादळे, सागर जाधव (गोरंबे), वैभव लोंढे (मुरगूड), शुभंम कोंडेकर (बानगे), नीलेश कडवे, संतोष धनगर, राहुल मोरे यांच्यासह १०० कुस्त्या पार पडल्या. पंच म्हणून मच्छिंद्र पाटील, तुकाराम चोपडे, संतोष निंबाळकर, लक्ष्मण मोरे, कृष्णात इंगळे, साताप्पा मगदूम, अभिजित निंबाळकर, विष्णू दंडवते, अमर पाटील यांनी काम पाहिले. समालोचन राजाराम चौगुले (खेबवडे) व प्रशांत चव्हाण (इचलकरंजी) यांनी केले. यावेळी सरपंच धनंजय तेलवेकर, पंचायत समितीच्या सदस्या उल्का तेलवेकर, उपसरपंच महेश चौगुले, सदस्य श्रीकांत ऊर्फ पिंंटू लोहार, नेताजी मोरे, विलास पोवार, युवराज मोरे उपस्थित होते.
पिंपळगाव खुर्दच्या मैदानात जमदाडे विजेता
By admin | Published: September 11, 2014 11:25 PM