लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत भुये विद्यामंदिरची जान्हवी धीरज खाडे हिने पहिला क्रमांक पटकावला. तिला वर्गशिक्षिका नम्रता नामे, मुख्याध्यापक श्रीकांत खैरे आदींचे मार्गदर्शन मिळाले.
कुसुमताई नायकवडी यांना आदरांजली
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर कुसुमताई नायकवडी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे आजीव सेवक प्रा. सी. एम. गायकवाड यांनी मनोगत वक्त केेले. संस्थेचे संचालक पी.सी. पाटील, सई खराडे, रणजित शिंदे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य विनय शिंदे, हर्षदा गोसावी, एस. आर. पाटील, जी.डी. भोसले, ए. एन. जाधव, उदय आतिकरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी के. जी. पाटील, डी. जी. किल्लेदार, पी. सी. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१७०७२०२१-कोल- मराठा बोर्डिग)
ना. पा. हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
फोटो - १७०७२०२१-कोल-रोहित बोथले, कन्हैया तायडे व स्नेहल रानभरे)
कोल्हापूर : रंकाळा वेश येथील नागोजीराव पाटणक हायस्कूलचा सेमी माध्यम व मराठी माध्यमाचा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे - रोहित राजाराम बोथले (वय ८५.४० टक्के), कन्हैया अनंत तायडे ( ८५.२० टक्के), स्नेहल मनोज रानभरे (८४ टक्के). विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आर. ए. पाटणकर, सचिव एन. एल. ठाकूर, मुख्याध्यापक एस. आर. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
अँग्लो उर्दू हायस्कूलचा १०० टक्के निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
(फोटो-१७०७२०२१-कोल-इफ्फतअंजूम नसरदी,सादिकाखातून चौधरी, सलमा देसाई, शाहीन मुजावर)
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीक, कोल्हापूर संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली पुलाचीचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे - इफ्फतअंजूम वसीम नसरदी (९०.८० टक्के), सादिकाखातून दोस्तमोहम्मद चौधरी (९०.४० टक्के), सलमा जमीर देसाई (८९.८० टक्के), शाहीन बिलाल मुजावर (८९.८०). हायस्कूलचे १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना संस्थेचे उपाध्यक्ष आदिल फरास, चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, शालेय समितीचे अध्यक्ष मलिक बागवान, जहॉगीर आत्तार, लियाकत मुजावर, रफिक शेख, आल्ताफ झांजी, पापाभाई बागवान, रफिक मुल्ला, फारुक पटवेगार, मुख्याध्यापक एम. एच. मोमीन यांचे मार्गदर्शन लाभले.