कोल्हापूर : येथील जनसंघर्ष सेनेच्या वतीने रोज कोरोनाबाधित रुग्ण, नातेवाईक आणि कोविड योद्ध्यांना जागेवर जाऊन घरचा डबा देण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या दहाव्या दिवशी महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी भेट दिली, यावेळी उपायुक्तांनी थेट डब्यांचे पॅकिंग करून मोहिमेत आपला सहभाग दर्शविला.
जनसंघर्ष सेनेच्या वतीने गेली १० दिवस रोज दोन चपाती, भाजी व दोन उकडलेली अंडी असे पौष्टिक जेवण दिले जाते. आतापर्यंत या युवकांनी एक हजार डबे वाटपाचा टप्पा पूर्ण करून आपली सामाजिक बांधीलकी जपली आहे. जनसंघर्ष सेनेने आपल्या कार्यालयासह १८ खोल्यांमध्ये कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी घराची व्यवस्था केली असून नातेवाइकांची राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था सेनेने केली आहे, शुक्रवारी प्रशासनाकडे चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी यावेळी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली, यावेळी जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, संदेश पोलादे, सोहम कुऱ्हाडे, अजिंक्य पुरीगोसावी, विश्वजित पाटील, राकेश देसाई, स्वरूप जगदाळे, साहिल भाट, गौरव पाटील, सौरव मांगुरे, प्रथमेश पोवार, साई पडळकर, प्रथमेश मुळीक, समर्थ मुळीक, सौरभ कोटलकी, राजनिश चौगुले, योगेश गोसावी, कौस्तुभ गोपुडगे,हर्ष बेंद्रे, विश्वजित मिसाळ, दर्शन मराठे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १४०५२०२१-कोल-घरचा डबा / कोलडेस्कलाही टाकला आहे.
ओळ - कोल्हापुरातील जनसंघर्ष सेनेच्या वतीने सुरू असलेल्या ‘घरचा डबा’ या उपक्रमात शुक्रवारी महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर या देखील सहभागी झाल्या.