लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर इक्विस्टिरियनतर्फ आयोजित केलेल्या द राॅयल हाॅर्स शो मध्ये पुण्याच्या जापलुप इक्वेस्टेरियन प्रथम, तर आर्यन्स इक्वेटेरियन्स क्लब द्वितीय व कोल्हापूरचा दक्षिण व्हॅली संघाने तृतीय स्थान पटकाविले. पुण्याचा सागर खापरे सर्वोत्कृष्ट घोडेस्वार ठरला. घोड्यांमध्ये पुण्याचा चॅम्पियन, तर कोल्हापूरचा लाॅर्ड सर्वोत्कृष्ट ठरले.
गेले तीन दिवस न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. स्पर्धेतील उत्कृष्ट संघ : जापलूप इक्वेस्टरीयन सेंटर, उत्कृष्ट घोडेस्वार (खुला गट) : सागर खापे (जापलूप सेंटर), उत्कृष्ट घोडेस्वार (लहान गट) : कवीक्ष ओतावणेकर (आर्यन्स इक्वेस्टरीयन सेंटर), उत्कृष्ट घोडेस्वार (कनिष्ठ गट ) : गंधार पोतदार (आर्यन्स इक्वेस्टेरीयन सेंटर), उत्कृष्ट घोडे : चॅम्पियन (आर्यन्स इक्वेस्टेरीयन सेंटर), चौदा वर्षांखालील उत्कृष्ट घोडेस्वार(कोल्हापूर) : आर्यवीर घाटगे (दक्षिण व्हॅली), चौदा वर्षांवरील उत्कृष्ट घोडेस्वार (कोल्हापूर) : क्रिशा मर्दा (दक्षिण व्हॅली), उत्कृष्ट संघ (कोल्हापूर) : दक्षिण व्हॅली, उत्कृष्ट घोडा (कोल्हापूर) : लॉर्ड (दक्षिण व्हॅली) यांनी यश मिळवले.स्पर्धेचा बक्षिस समारंभ शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाला. यावेळी केईईचे अध्यक्ष मालोजीराजे, समरजितसिंह घाटगे, व्ही.बी.पाटील, ऋतुराज इंगळे, सुहासिनीदेवी घाटगे, उषा थोरात, मौसमी आवाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.