शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

जयस्विन, इक्बालची आगेकूच

By admin | Published: December 15, 2015 12:20 AM

अंडर-१४ टेनिस स्पर्धा : अखिल भारतीय सुपर सीरिजला कोल्हापुरात प्रारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे मेरी वेदर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या योनेक्स सनराईज अखिल भारतीय टेनिस सुपर सीरिज स्पर्धेत सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या सामन्यात प्रथम मानांकित पंजाबच्या जयस्विन सिदानाने १२ व्या मानांकित मुंबईच्या लेस्टन वाझवर, तर मुलांमध्ये तेलंगणच्या तेराव्या मानांकित इक्बाल खानने तमिळनाडूच्या अरोन पॉलवर मात करीत आगेकूच केली. स्पर्धेचे उद्घाटन ‘आयकर’चे सहायक संचालक रवी मेहरेजा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रभाकर दळवी, डॉ. दिनेश कित्तुरे, दिलीप ताटे, सचिन कदम, प्रभाकर पाटील, सरदार मोमीन, अशोक मुराई उपस्थित होते. दिवसभरातील निकाल असा :मुले : गिरीश चौगले (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध शशांक नरदे (कर्नाटक), हर्ष कुमार (तमिळनाडू) वि. वि. अथर्व पाटील (महाराष्ट्र), शंतनू पवार (महाराष्ट्र) वि. वि. प्रसाद इराळे (महाराष्ट्र), विशाल रेडी (कर्नाटक) वि. वि. आकर्ष गांवकर (कर्नाटक), श्रीजित सेन (महाराष्ट्र) वि. वि. अन्मय देवराज (कर्नाटक), नवदीश बंजानी (महाराष्ट्र) वि. वि. इंद्रजित बोराडे (महाराष्ट्र), खान मोहमद वि. वि. हृदय सोनावले (दोघे कर्नाटक), भुवन अंबेकलू (कर्नाटक) वि. वि. अमितेश सक्सेना (तमिळनाडू), जयवर्धन पाटील (महाराष्ट्र) वि. वि. सुंदर सेल्वम (तमिळनाडू), वर्धन कारकल (महाराष्ट्र) वि. वि अर्जुन कुंडू (गुजरात), आदित्य रॉय चौधरी (पं. बंगाल) वि. वि. ऋषिकेश वैद्य (कर्नाटक).मुलीत : संस्कृती गुप्ता (कर्नाटक) वि. वि. शशिका अगरवाल (तमिळनाडू), बेला ताम्हणकर (महाराष्ट्र) वि. वि. स्मृती भसीन (आंध्र प्रदेश), गार्गी हवालदार वि. वि. बेला पंढरपुरे (दोघे महाराष्ट्र), पावनी पाठक वि. वि. सानिका कांबळी (दोघी महाराष्ट्र), अनन्या कोथाकोटा (आंध्र प्रदेश) वि. वि. कुशी संतोष (आंध्र प्रदेश), संजना सिरिमला (तेलंगणा) वि. वि. जिया लोढा (पुणे), दुर्वा देव (महाराष्ट्र) वि. वि. वैभवी सक्सेना (कर्नाटक).