शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मिरमध्ये शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 10:20 AM

belgaon, kolhapur, Karnatak, IndianArmy जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसवराज पाटील (वय २६, रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांना बुधवार (२) रोजी वीरगती प्राप्त झाली.

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मिरमध्ये शहीदसंकेश्वरनजीकच्या नेर्लीचा सुपूत्र : शासकीय इतमामात आज अंत्यविधी

गडहिंग्लज : जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसवराज पाटील (वय २६, रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांना बुधवार (२) रोजी वीरगती प्राप्त झाली.मंगळवारी (१) रात्रीच्या सुमारास काश्मीरच्या ६२ आरआर पोस्टींगवरील बारामुल्ला (उरी) सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत चेतन हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सैनिक रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.लहानपणीच चेतनच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. चेतन व त्याचा लहान भाऊ दयानंद या दोघांचे पालनपोषण त्यांच्या आत्या शोभा बाबू गुंडाळी (रा. हेब्बाळ, ता. हुक्केरी) यांनी केले आहे.चेतनचे बारावीपर्यंतचे शिक्षण डी.एल. खोत ज्युनिअर कॉलेज हेब्बाळ येथे झाले होते. २०१४ मध्ये नाशिक येथे सैन्यदलात चेतन भरती झाले. दोन महिन्यापूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. नेर्लीमध्ये चेतन यांची शेती असून वर्षभरापूर्वी बसवान मंदिर रोडलगत त्यांनी नवीन घर बांधले आहे.चेतन शहीद होण्याने गावात शोककळा पसरली आहे. आज (शुक्रवारी) चेतन यांच्या पार्थिवावर गावातील कावेरी हायस्कूलजवळील पाटील शेतवडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिस व महसूल प्रशासन आणि ग्रामस्थाकडून लाडक्या सुपूत्राच्या अंत्यविधीची तयारी सुरू आहे.कुटुंबीय देशसेवेतचेतन यांचे वडील बसवराज हेदखील सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे २० वर्षापूर्वी निधन झाले आहे. लहानपणापासून आई-वडीलांच्या मायेला पोरक्या झालेल्या चेतन हा सैन्यदलात तर त्याचा लहान भाऊ दयानंद हाही नौदलात आहे. मात्र, सेवा बजावताना चेतनला वीरगती प्राप्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक