शिरोळ येथे मंगळवारी श्री पद्माराजे विद्यालयात मंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करून संवाद साधला. महापुरामुळे आमची शेती उद्ध्वस्त झाली. घरे पाण्यात गेली आहेत. प्रत्येक वर्षी महापूर येणार असेल तर त्यावर पर्याय काढा, अशा भावना पूरग्रस्तांनी व्यक्त केल्या.
यावेळी जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, महापुराचा फटका शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसतो.
मागणीप्रमाणे अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यात आले. यावेळच्या महापुराची तीव्रता कमी दिसून आली. पूर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे केले जाणार आहेत. अन्न-धान्य गावात मिळेल याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, तहसीलदार अर्पणा मोरे, यांच्यासह पूरग्रस्त उपस्थित होते.
फोटो ओळ : शिरोळ येथे निवारा केंद्रात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.