शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 5:10 PM

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी

गणेशवाडी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याबाबतचा भूमिका योग्य वेळी घेतली जाईल. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त शरद पवारांना आहे. ते योग्य वेळी निर्णय घेतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.औरवाड (ता. शिरोळ) येथे राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान यांच्या फंडातून हजरत शेख चाँद पीर दर्गा येथे सभागृह बांधकामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याची पायाभरणी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी माजी आमदार उल्हास पाटील, सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, अशरफ पटेल प्रमुख उपस्थित होते.माजी आमदार उल्हास पाटील यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले. या वेळी रोहित पाटील, मदन कारंडे, मैनुद्दीन बागवान यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी अभिजित पवार, विक्रमसिंह जगदाळे, आबीद पटेल, माजीद पटेल, नागेश कोळी, किरण कांबळे, प्रशांत मंगसुळे, कमरूदीन पटेल, शहानवाज पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हातकणंगलेतून तिसरा पर्यायहातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी, अभिजित पवार, नागेश कोळी, हजरत पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली. या वेळी आमदार जयंत पाटील यांनी याबाबत थेट नकार दिला नाही. मात्र, याबाबतचा निर्णय शरद पवार यांच्या कोर्टात ढकलला आहे. यामुळे हातकणंगलेतून तिसरा पर्याय म्हणून प्रतीक पाटील यांचे नाव पुढे येत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील