कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाईपलाईनचे काम करण्यासाठी रविवारपासून जयंती नाला पंचगंगेत सोडण्यास सुरुवात झाली. नाल्यातील उपसा निम्म्यावर आणल्याने दिवसभरात तब्बल २४ एमएलडी (दशलक्ष लिटर) दूषित पाणी पंचगंगेत मिसळले. दरम्यान, सकाळी दहा वाजल्यापासून पाईपलाईन टाकण्याच्या कामास युद्धपातळीवर सुरुवात झाल्याचे जलअभियंता मनिष पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कसबा बावडा एसटीपी केंद्र ३१ मार्चपर्यंत कोणत्याही स्थितीत सुरू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिकेला एसटीपी सुरू करण्याशिवाय गत्यंतर नाही. एसटीपी सुरू होण्यासाठी पूर्वेकडील शेतातून नदीपर्यंत जाणारी दीड किलोमीटरपैकी रखडलेली ७५० मीटरची पाईपलाईन पूर्ण करणे गरजेचे आहे. काळ्या व भुसभुशीत शेतीच्या जमिनीवरूनच एसटीपीचे पाणी वाहत असल्याने हे काम करण्यासाठी एसटीपी काही दिवस बंद ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. याकामी आयुक्तांनी पुढाकार घेत एमपीसीबी व याचिकाकर्ते यांची समन्वय बैठक घेतली. त्यानुसार तीन आठवडे जयंती नाल्याचे पाणी पंचगंगेत सोडण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून महापालिकेने एसटीपी केंद्र बंद केले. मात्र, रखडलेल्या ७५० मीटरपैकी ६५० मीटरचे काम होईपर्यंत जुना एसटीपी सुरू राहणार आहे. उर्वरित १०० मीटरचे काम पूर्ण करण्यासाठीच चार दिवसांसाठी दोन्ही एसटीपी बंद करावे लागणार आहेत.शुद्धतेसाठी प्रयत्ननाल्यातून दररोज किमान ४८ एमएलडी सांडपाण्याचा उपसा होतो. नाल्यातील पाणी कमी करण्यासाठी महापालिकेने नाल्याशेजारी असणाऱ्या सर्व सर्व्हिसिंग सेंटरना बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच दूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी शुद्धता (क्लोरिनेशन)के ली जात असल्याचे मनिष पवार यांनी स्पष्ट केले.
ठरल्याप्रमाणे जयंती नाला पंचगंगेत
By admin | Published: February 16, 2015 12:16 AM