शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

जयप्रभा स्टुडिओ व्यवहार: राजेश क्षीरसागर, सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 5:18 PM

५० कोटींची जागा ६.५ कोटींत कशी घेतली, पानपट्टीवाल्याने एवढी रोकड कुठून आणली?

कोल्हापूर : राज्य शासनाच्या ताब्यातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार संस्थानकालीन अटी व शर्तींचा भंग करून झाला आहे. ५० कोटींची जागा साडेसहा कोटींत कशी घेतली? याची चौकशी करून जागेच्या व्यवहारातील प्रमुख व राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करावी, तसेच एक साधा पानपट्टीचालक असलेल्या राऊत यांनी साडेसहा कोटींची रक्कम कोठून आणली, याची ‘ईडी’ने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मुख्यत: यासंबंधीची तक्रार केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी यावेळी उपस्थित होते.नगरविकास विभागाने महापालिकेला स्टुडिओ ताब्यात घेण्यासंदर्भात दिलेले पत्र चुकीचे व बेकायदेशीर असल्यामुळे स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही घाईगडबडीने करण्यात येऊ नये. माझी त्यास हरकत आहे, अशा आशयाचे लेखी पत्र इंगवले यांनी जिल्हाधिकारी तथा प्रशासक राहुल रेखावार यांना मंगळवारी दिले.इंगवले म्हणाले, राज्य शासनाच्या ताब्यात असणारी जयप्रभाची जागा क्षीरसागर कुटुंब व पानपट्टीचालक सचिन राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे दाखवून १५ फेब्रुवारी २०२० रोजी खरेदी केली आहे.मुळात संस्थान काळात पेंढारकर कुटुंबीयांना ही जागा शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतर करता येणार नाही, अशा शर्ती व अटींवर देण्यात आली होती. तरीही भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी शक्कल लढवून लिलाव पद्धतीने ती जागा लता मंगेशकर यांना हस्तांतरित केली. तेेव्हा अटी व शर्तींचा भंग झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाची फसवणूक किंवा विनापरवाना मंगेशकर कुटुंबीयांनी ती जागा सचिन राऊत यांना खरेदी दिली. साडेसहा कोटी एकरकमी रक्कम सचिन राऊत यांनी भरली आहे.

पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न

  • जागा खरेदी-विक्री करता येत नसताना तिचा व्यवहार झालाच कसा?
  • पानपट्टीचालक असलेल्या सचिन राऊत यांनी एकरकमी साडेसहा कोटी आणले कोठून?
  • सुमारे ५० कोटी किमतीच्या जागेचा व्यवहार साडेसहा कोटीत कसा झाला?
  • राज्य शासन राजेश क्षीरसागर यांचे एवढे लाड का करीत आहे?

क्षीरसागर यांना दिले आव्हानपन्नास कोटींची जागा साडेसहा कोटींत कशी घेतली, पानपट्टी चालविणाऱ्या सचिन राऊत याने एवढी रक्कम आणली कोठून, त्याने आयटी रिटर्न तरी भरले आहेत का, हे राजेश क्षीरसागर यांनी बिंदू चौकात येऊन पटवून सांगितले, तर मी माफी मागतो आणि या वादातून माघार घेतो, असे आव्हान इंगवले यांनी यावेळी दिले.

उच्च न्यायालयात जाणारजयप्रभा स्टुडिओच्या खरेदी-विक्री व्यवहारात अटी व शर्तींचा भंग झाला असल्याने मुद्रांक शुल्क विभाग व आयकर विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. आज, बुधवारी आयकर अधिकाऱ्यांना भेटून सचिन राऊत यांच्या आर्थिक परिस्थितीची, तसेच त्यांनी केलेल्या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे. त्यांनी दखल घेतली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा इंगवले यांनी दिला.

चुना लावणाऱ्याचा उदयपानपट्टीचालक असलेल्या गुलाबराव पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुखांनी मंत्री केले, त्यांनीच पक्षाला चुना लावला. आता कोल्हापुरात पानपट्टीवाल्याच्या नावाखाली चुना लावणारा एक नवीन चुनावाला कोल्हापुरात उदयास आला असल्याची टीका इंगवले यांनी यावेळी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर