कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ येथील खासगी वापरासाठी बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये. स्टुडिओ परिसर चित्रपटांच्या शूटिंगसाठी आरक्षित ठेवावा, असा प्रस्ताव उद्या, मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. याचबरोबर थेट गॅस पाईपलाईनचा प्रस्तावही असून याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तसेच घरफाळा घोटाळ्यावरूनही सभा वादळी होण्याची शक्यता आहे.महापालिकेची २५ सप्टेंबर रोजीची महासभा मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजता महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षक्षेतखाली होणार आहे. या सभेत महापालिकेच्या रक्तपेढीतील रक्तपिशवीचे दर सीपीआर रक्तपेढीप्रमाणे घेणे, सीपीआरला औद्योगिकऐवजी व्यापारी दराने पाणीपट्टी आकारणी करणे, कोरोनाबाधित सर्वच कर्मचाऱ्यांना औषध बिल देणे असे प्रस्ताव आहेत.आता तरी गॅस पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर होणार का?मागील सभा तहकूब केल्यानंतर खासदार संभाजीराजे संतप्त झाले होते. सभा तहकूब करण्याऐवजी गॅस पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर केला असता तर आनंद झाला असता, असेही त्यांनी म्हटले. उद्याच्या सभेत हा प्रस्ताव असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.मुक्त सैनिक वसाहत, प्रभाग क्रमांक ११ मध्ये महापालिकेच्या मालकीची जागा वाचनालयासाठी आरक्षित आहे. या जागेवर लोकसहभागातून वाचनालय करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-लायब्ररी करणे, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.
जयप्रभा स्टुडिओ शूटिंगसाठी होणार आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 5:37 PM
Muncipal Corporation, kolhapurnews जयप्रभा स्टुडिओ येथील खासगी वापरासाठी बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये. स्टुडिओ परिसर चित्रपटांच्या शूटिंगसाठी आरक्षित ठेवावा, असा प्रस्ताव उद्या, मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. याचबरोबर थेट गॅस पाईपलाईनचा प्रस्तावही असून याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तसेच घरफाळा घोटाळ्यावरूनही सभा वादळी होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देजयप्रभा स्टुडिओ शूटिंगसाठी होणार आरक्षितउद्याच्या महासभेत प्रस्ताव : थेट गॅस पाईपलाईनच्या मंजुरीकडे नजरा