लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेली साडेचार महिने बहुचर्चित राहिलेला कोल्हापूर-सांगली महामार्ग हस्तांतरणाचा विषय आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन महिन्यांपूर्वी या मार्गावरील मिळकतधारकांनी रस्ता हस्तांतरण करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पालिकेकडे केली होती. रस्ता हस्तांतरण झाल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पालिकेला पेलवणार का? हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील दारू दुकाने बंद झाली आहेत. शहरातून जाणारा सांगली-कोल्हापूर महामार्गावर बहुसंख्य दारू दुकाने होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दारू दुकाने सुरू करण्यासाठी रस्ता हस्तांतरणाचा प्रश्न पुढे आला होता. अर्थकारण व राजकीय घडामोडीतून हा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात आले होते. सामाजिक संघटनांमधून रस्ता हस्तांतरणाला मोठा विरोध झाला होता. विरोधानंतर रस्ता हस्तांतरणाचा विषय बाजूला पडला. शहरातील विना परवाना दारू विक्री बंद करावी, अशी मागणी शाहू आघाडीने नगराध्यक्षा डॉ. निता माने यांच्याकडे केली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालामुळे दारू दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रस्ता हस्तांतरणाचा विषय दारू दुकानदारांसाठी महत्त्वाचा राहिला नसला तरी न्यायालयाच्या निर्णयाबाबत शासनाने अद्याप कोणतेही आदेश दिलेनसल्यामुळे दारू दुकाने सुरू करण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. अशा परिस्थितीत आज, सोमवारी पालिकेच्या विशेष सभेत कोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणाचा विषय होत आहे. दरम्यान, १८ आॅगस्ट रोजी रस्ता हस्तांतरणाबाबत पालिकेकडे आठ नगरसेवकांनी दिलेल्या अर्जानुसार रस्ता हस्तांतरणाचा विषय अजेंड्यावर आला आहे.पालिकेपुढे समस्याकोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणावरून पालिकेची सभा होत असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत काम रखडलेले आहे. पालिकेच्या आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यात या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील महत्त्वाचा आहे. याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे. शिरोळ - वाडी रोड हस्तांतरणापूर्वी कन्यागतच्या निधीतून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा रस्ता पूर्ण झाला होता. सतराव्या गल्लीतील रस्ता प्रश्नावरून दोन माजी नगराध्यक्षांनी आंदोलनही केले होते. हा प्रश्नदेखील अद्याप सुटलेलानाही.मिळकतधारकांचा प्रश्नजयसिंगपूर-शिरोळ-वाडी रोडप्रमाणे सांगली-कोल्हापूर दोन जिल्ह्यांना जोडणारा शहरातील राज्य मार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करावा, अशी म् ाागणी या मार्गावरील मिळकतधारकांनी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. जयसिंगपूरमधील हा रस्ता हस्तांतर करा, अन्यथा वडिलोपार्जित आमची जागा रस्त्यात वर्ग होईल, असे साकडे पालिकेला घालण्यात आले आहे.
जयसिंगपूर रस्ता हस्तांतरणाचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:26 AM