संदीप बावचे।जयसिंगपूर : शहरातून जाणारा कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाच्या ठरावाला वर्षपूर्ती होत आली तरी हा रस्ता कागदावरच राहिला आहे. एकीकडे हस्तांतरणाचा ठराव तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरणाबाबत कोणताही पत्रव्यवहार पालिकेने केलेला नाही. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दुजोरा दिला असून लोकप्रतिनिधींच्या या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचाच प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेतील बांधकाम विभागाचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील दारु दुकाने बंद झाली होती. शहरातून जाणारा सांगली-कोल्हापूर महामार्गावर बहुसंख्य दारु दुकाने होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दारु दुकाने सुरु करण्यासाठी रस्ता हस्तांतरणाचा प्रश्न पुढे आला होता. हा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात आले होते. मात्र, सामाजिक संघटनांनी रस्ता हस्तांतरणाला मोठा विरोध केला होता.
विरोधानंतर रस्ता हस्तांतरणाचा विषय बाजूला पडला.२८ आॅगस्ट २०१७ रोजी कोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणावरुन पालिकेची सभा झाली. या सभेत रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाचा विषय मंजूर झाला. रस्ता हस्तांतरणाचा विषय १५ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला होता. सभेस नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवक असे आठजण अनुपस्थित होते. रस्ता हस्तांतरणाचा ठराव झाला असल ातरी सध्या या महामार्गावरील प्रलंबित कामाचे भिजत घोंगडे पडले आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी कामाबाबत आवाज उठविण्याची गरज आहे.हस्तांतरणाला विरोधसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत काम रखडलेले आहे. पालिकेला आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यात या रस्त्याच्या देखभाल-दुरूस्तीचा खर्च पेलणारा नाही, याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करावा, असा सूर उमटला होता. महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचा बोजा जनतेवरच पडणार आहे. त्यामुळे हा रस्ता पालीकेकडे हस्तांतरण करू नये, अशी मागणी दोन नगरसेवकांनी केली होती.नेत्यांना प्रश्नांचा विसरकोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणाचा ठराव मंजूर झाल्यानंतर शहरातील विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाºयांनी महामार्ग हस्तांतरणाला विरोध केला होता. ठराव रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रस्ता हस्तांतरण विरोधी कृती समितीने दिला होता. मात्र, विरोध करणारे आणि आंदोलनाचा इशारा देणारे पक्ष व संघटनांच्या नेत्यांना या प्रश्नाचा विसर पडला असला तरी किमान वाहतुकीस धोकादायक ठरलेल्या या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जयसिंगपूर शहरातील उड्डाणपूल रद्द करावा, असा यापूर्वी पालिकेने ठराव दिलेला आहे. मात्र,जयसिंगपूर शहरातून जाणारा कोल्हापूर-सांगलीमहामार्ग हस्तांतरणाचा कोणताही ठरावनगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आलेला नाही.- व्ही. डी. शिंदे, बांधकाम उपअभियंता जयसिंगपूरशहरातून जाणारा महामार्ग रस्ता हस्तांतरणाचा ठराव झाला आहे. हा रस्ता डी-नोटिफाईड झाल्याशिवाय हस्तांतरीत होणार नाही. मात्र, ठरावाबाबतच्या पत्रव्यवहाराची माहिती घेऊ.- एन. एस. पवार, अभियंता,नगरपालिका बांधकाम विभाग