ठळक मुद्देरविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला
कोल्हापूर -: पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार दिवसांपासून बंद असून आज रविवारी सकाळीही परिस्थिती जैसे थेच आहे.मात्र प्रशासनाने जेसिबी पाण्यात घातला असुन वाहने सोडण्यासाठी चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक आज सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, चाचणी पूर्ण झाली असून वाहतूक सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला, तेव्हा ९.३० वाजता शिरोली उड्डाण पुलावर पुराच्या पाण्याची पातळी अजूनही साडेतीन फुट होती. हे पाणी संथ गतीने उतरत आहे.