शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सोनगे शाळेसमोरच जनावरांची दावण

By admin | Published: January 01, 2017 11:27 PM

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश

म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह आजूबाजूला जनावरे बांधण्याचा अड्डा बनविला आहे. याठिकाणी बैलांसह म्हैस, गाय, आदी जनावरे दिवसभर बांधली जातात. त्यामुळे शाळेत ये-जा करताना मुलांना या जनावरांकडून धोका उद्भवू शकतो. याबाबत पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, ही जनावरे शाळेसभोवती न बांधता ती अन्यत्र बांधण्यात यावीत, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांतून होत आहे.सोनगे येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत १७० हून अधिक विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी दररोज येतात; परंतु शाळेच्या प्रवेशद्वारासह अवतीभोवती ग्रामस्थ आपली जनावरे बांधतात. येथूनच विद्यार्थी ये-जा करतात किंवा खेळत असतात. अशावेळी या जनावरांकडून त्यांना धोका उद्भवू शकतो. तसेच सततपणे ही जनावरे येथे बांधल्याने शेणाचाही वास सुटलेला असतो. मुख्य प्रवेशद्वारावर नेहमीच दोन गायी आणि दोन बैल बांधलेले असतात, तर आजूबाजूला चार ते पाच जनावरे बांधलेली असतात. त्यांनी न खाल्लेला चाराही शाळेजवळ पडलेला असतो. (वार्ताहर)अनर्थ होण्याअगोदर सावधानतेची गरज गोठ्यातील जागा बदल म्हणून सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत ही जनावरे घराबाहेरच बांधली जातात; परंतु यापूर्वी २००० मध्ये चिखलीहून येथे शिक्षणासाठी आलेल्या पंकज चव्हाण या विद्यार्थ्याला येथील जनावरांचे शिंग लागल्याने गंभीर इजा झाली होती. मात्र, त्यानंतरही येथील जनावरे बांधण्याची जागा बदललेली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून, ग्रामपंचायत एखाद्या विद्यार्थ्याचा बळी जाण्याचीच वाट पाहत आहे की काय? असा संतप्त सवालही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.