कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जी. एस. गोकावी, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे. एस. बागी उपस्थित होते.
फोटो (१२०१२०२१-कोल-विद्यापीठ जयंती) : शिवाजी विद्यापीठात मंगळवारी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, जी. एस. गोकावी, जे. एस. बागी, जी.आर. पळसे, व्ही. टी. पाटील, आर.व्ही. गुरव आदींनी अभिवादन केले.