लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जितो कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी जितेंद्र राठोड, तर सचिवपदी गिरीश शहा व खजानीसपदी युवराज ओसवाल यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांना मावळते अध्यक्ष राजीव पारिख यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार प्रदान करण्यात आला.
मावळते अध्यक्ष पारिख यांनी आपल्या कार्यकाळातील कामाचा आढावा घेतला. यात २०१९च्या महापुरावेळी केलेली मदतकार्य, जनावरांसाठी चारा वाटप, महिला कक्ष, युवा वर्गाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम पार पाडले. कोविड-१९च्या संसर्ग काळात पीपीई कीट, एन-९५, मास्क व अन्य साहित्य शासनास सुपुर्द केल्याचे नमूद केले.
नूतन अध्यक्ष राठोड म्हणाले, येत्या काळात चॅप्टरच्या माध्यमातून जितो आवास, जितो बिझनेस पार्क, स्पोर्टस व सदस्य संख्या वाढविणे व विविध कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. युवा वर्गासह महिला वर्गाच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सचिव गिरीश शहा यांनी चॅप्टरच्या सर्व कार्यक्रमांसाठी सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी युवराज ओसवाल, रवी संघवी, रमण संघवी, हर्षद दलाल, अनिल पाटील, डाॅ. शीतल पाटील, निरज शहा, पुनीत गांधी, यतीश शहा आदी उपस्थित होते.
फोटो : ०८०४२०२१-कोल-जीतो
आेळी : जितो कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी व सचिवपदी निवड झाल्यानंतर मावळते अध्यक्ष राजीव पारिख यांनी जितेंद्र राठोड व गिरीश शहा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.