लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या क्षणी मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. राष्टÑवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, अशोक फराकटे, कागल पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार पाटील व शामराव भोई यांनी राष्टÑवादी-भाजप आघाडीला धक्का देत विरोधी पॅनेलमधून उमेदवारी घेतल्याने राधानगरी, भुदरगड व कागलमधील समीकरणे बदलणार आहेत.
माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दोन्ही पॅनेलची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. राष्टÑवादी-भाजप आघाडीचे इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक आचार्य विद्यानंद सांस्कृतिक हॉल येथे; तर विरोधी शिवसेनेचे समर्थक नष्टे हॉल येथे थांबून होते. बºयाच नावांचा काथ्याकूट करीत राष्टÑवादी-भाजपच्या ‘महालक्ष्मी शेतकरी विकास’ पॅनेलमधील उमेदवारांची घोषणा दुपारी साडेबारा वाजता राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केली. विरोधकांची नजर राष्टÑवादी-भाजपच्या पॅनेलकडे होती.
कोणाकोणाला संधी मिळाली याची माहिती घेत नाराजांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी यंत्रणा लावली होती. त्यानुसार जीवन पाटील, अशोक फराकटे, शामराव भोई, नंदकुमार पाटील यांना आपल्याकडे वळविण्यात प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, दिनकरराव जाधव यांना यश आले. शिवसेनेचे नेते मंडलिक यांच्या रुईकर कॉलनी येथील घरातून सूत्रे हलवीत होते. दुपारी अडीच वाजता त्यांनी ‘राजर्षी शाहू पॅनेल’ची घोषणा केली. यामध्ये राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देऊन आलेले जीवन पाटील यांना संस्था गटातून, अशोक फराकटे यांना गट क्रमांक २ मधून, तर नंदकुमार पाटील यांना गट क्रमांक ३ मधून संधी देण्यात आली. ‘महालक्ष्मी’ पॅनेलमध्ये के. पी. पाटील, ए. वाय. पाटील,प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, धनाजीराव देसाई व श्रीपती पाटील यांना; तर ‘राजर्षी शाहू’ पॅनेलमध्ये विजयसिंह मोरे याविद्यमान संचालकांना संधी मिळाली.देसार्इं, जमादारांचा पत्ता कट !राष्टÑवादीच्या पॅनेलमध्ये गट क्रमांक पाचमधून शेखर देसाई (गारगोटी) यांचे नाव निश्चित झाले होते; पण शेवटच्या क्षणी मधुकर देसाई (म्हसवे) यांना संधी देण्यात आली; तर विरोधी पॅनेलमध्ये संस्था गटातून राजेखान जमादारयांना थांबवून जीवन पाटील यांची ऐनवेळी घोषणा केली.कौलगेत फिरकायचं नायराष्टÑवादीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर डावललेले इच्छुक चांगलेच संतप्त झाले होते. कौलगे (ता. कागल) येथील चंद्रशेखर सावंत यांनी ‘आता कौलगेत तुम्ही फिरकायचं नाय!’ अशा शब्दांत उपस्थित नेत्यांना तंबी दिली.नेत्यांच्या नावाचा उद्धार !दोन्ही पॅनेलची घोषणा होताच उमेदवारी न मिळालेल्यांनी आपला संताप व्यक्त करताना नेत्यांच्या नावांचा चांगलाच उद्धार केला. ‘पै-पाहुण्यांसाठी किती दिवस माघार घेत राहायचे ?’ अशा बोलक्या प्रतिक्रियेसह तिखट शब्दांत नेत्यांचा समाचार घेतला.