शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची’

By admin | Published: March 04, 2016 11:25 PM

विजेत्या पती-पत्नीसाठी पुरस्कार : ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’च्या विविध मनोरंजक स्पर्धा

कोल्हापूर : नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा ‘कलर्स’ चॅनेल व ‘लोकमत सखी मंच’ प्रेम या विषयावरील अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन येत आहेत. आतापर्यंत ‘कलर्स’ चॅनेल व ‘लोकमत सखी मंच’च्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची पसंती व भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. याच शृंखलेत पुन्हा एकदा पती-पत्नींच्या नात्यातील प्रेमाच्या बंधनांना स्पर्धांमधून सर्वांसमोर आणणारा एक नितांतसुंदर कार्यक्रम म्हणजे ‘जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची.’ या अंतर्गत तीन स्पर्धा होणार असून, तीनही स्पर्धेच्या विजेत्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. पहिली स्पर्धा म्हणजे बेस्ट जोडी (गीत). अतूट गायक जोडी - यामध्ये पती-पत्नी यांनी मिळून गाणे सादर करावयाचे आहे; पण हे गाणे पुनर्जन्मावर आधारित कोणत्याही सिनेमातील असायला हवे. दुसरी स्पर्धा आहे बेस्ट जोडी (अभिनय). अतूट अभिनय जोडी - यातदेखील कोणत्याही पुनर्जन्मावर आधारित कुठल्याही सिनेमातील डायलॉग किंवा सीन पती-पत्नी यांनी मिळून सादर करावयाचा आहे. तिसरी स्पर्धा - बेस्ट जोडी (कविता) अतूट प्रेम जोडी - यात पुनर्जन्मावर आधारित स्वरचित कविता दोघांनी मिळून सादर करावयाची आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या दहा जोड्यांना प्रवेश दिला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने पती-पत्नींसाठी अतिशय सुंदर विषय हाताळले जाणार असून, दोघांना आपल्या नात्याची परीक्षा या स्पर्धांमधून द्यायची आहे आणि पुरस्कारही जिंकायचा आहे. याशिवाय उपस्थित प्रेक्षकांसाठी ‘बॉलिवूड जोडी’ ही मनोरंजक स्पर्धा ठेवली आहे. यात सिनेजगतातील जोडी बनून यायचे आहे. तसा गेटअप व वेशभूषा करायची आहे. यात पती-पत्नी असणे आवश्यक नाही. यात दोन सखी, बहीण-भाऊ किंवा पती-पत्नी असे भाग घेऊ शकतात. ‘बेस्ट बॉलिवूड जोडी’ म्हणून विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. ‘कलर्स’ चॅनेलने नेहमीच अशा सुंदर विषयांवर मालिकांचे प्रसारण करून एक स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करून तो कायम राखण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नात आणखी एक नि:स्सीम प्रेमावर आधारित ‘कसम’ नावाची मालिका सोमवार (दि. ७)पासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. एका मुलीचा आपल्या प्रेमावर इतका प्रचंड विश्वास असतो की, तो मिळविण्यासाठी दुसरा जन्म घेऊन त्या प्रेमाला मिळविण्यात ती यशस्वी होते. ‘कसम’ ही मालिका ऋषी आणि तनुश्री या दोन प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीवर आधारित असून, त्यांच्या प्रेमाच्या वाटेत प्रेम, विरह आणि प्रेम अशा प्रवासाची सुंदर मांडणी करून प्रेम हेच जगण्याची आणि जगविण्याची खरी ताकद आहे, असे सांगितले आहे. अशा प्रेमाच्या ‘कसम’ या मालिकेसोबत वरील स्पर्धा आणि त्यातील विजेत्या स्पर्धकांना विशेष पुरस्कार एकूणच ‘जोडी जन्मोजन्मांची, कसम प्रेमाची’ हा ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’चा कार्यक्रम प्रेमाच्या वेगळ्या जगात नेण्याची किमया करील, यात शंका नाही. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. कार्यक्रम गुरुवारी (दि. १०) दुपारी चार वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे होणार असून, अधिक माहितीकरिता ९६२३८९५८६६ येथे संपर्क साधावा.