शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘चांगभलं’च्या गजराने जोतिबा डोंगर दुमदुमला

By admin | Published: February 29, 2016 12:48 AM

पहिला खेटा उत्साहात : कोल्हापूर ते जोतिबा डोंगर चालत आलेल्या भाविकांच्या गर्दीने पायवाटा फुलल्या; रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओघ

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा पहिला रविवार खेटा मोठ्याधार्मिक उत्साहात पार पडला. ‘चांगभलं’ गजरात पहाटेपासूनच कोल्हापूर ते जोतिबा डोंगर या पायवाटा हजारो भाविकांच्या गर्दीने सफुलून गेल्या होत्या.जोतिबा देवाच्या पहिल्या रविवार खेट्याला पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर या पायवाटेने चालत आलेल्या भाविकांनी ‘चांगभलं’चा गजर करीत जोतिबा देवाचे दर्शन घेतले. सकाळी भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिरासभोवती चार-पाच दर्शन रांगा लागल्या. दर्शन रांग नियंत्रणासाठी कोडोली पोलीस, देवस्थान व पुजारी समितीचे कर्मचारी तैनात होते. सकाळी अभिषेक, महापूजा, धुपारती सोहळा झाला. दुपारी अभिषेक, महापूजा, सायंकाळी आरती, रात्री आठ वाजता पालखी सोहळा झाला. रात्री अकरापर्यंत भाविक जोतिबा दर्शनासाठी येत होते. जोतिबा खेट्यासाठी आलेल्या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. व्यापार संकुल, शासकीय विश्रामधाम परिसरात चार चाकी व अवजड वाहने पार्क केली होती. जोतिबा मंदिराकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मंदिराच्या आवारात दुपदरी दर्शन रांगा लागल्या होत्या. एस. टी. महामंडळाने जादा गाड्याची सोय केली. ग्रामपंचायतीने स्वच्छता व पाणीपुरवठ्याची सोय केली होती. (वार्ताहर)कोल्हापूरकरांची गर्दी जोतिबा खेटे यात्रेला कोल्हापूरच्या भाविकांची लक्षणीय गर्दी असते. सलग पाच रविवार हे खेटे पायी चालत पूर्ण करतात. पहाटेच्या वेळी महाविद्यालयीन व तरूणवर्गाची मोठी गर्दी असते. शासकीय नोकरदार व महिलावर्गाची दिवसभर गर्दी सुरूच असते. सायंकाळनंतर दुकानदार व चाकरमानी या कोल्हापूरकरांची गर्दी ठरलेली असल्याने या यात्रेला कोल्हापूरकरांचे खेटे असे म्हटले जाते.मंदिरात गावभंडारासंभाजी भगवान दमाने ( सांगली ) या भाविकाने जोतिबा मंदिरात गावभंडारा घातला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. चालत आलेल्या भाविकांसाठी तरूण मंडळे, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी प्रसाद वाटप केला.