शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

जोतिबाच्या खेटे यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:34 AM

जोतिबा : जोतिबा मंदिर येथे चौथ्या रविवारच्या खेट्याने खेटे यात्रेची पारंपरिक पद्धतीने सांगता झाली. पहाटेच्या वेळी ‘चांगभलं’च्या गजराने अवघी ...

जोतिबा : जोतिबा मंदिर येथे चौथ्या रविवारच्या खेट्याने खेटे यात्रेची पारंपरिक पद्धतीने सांगता झाली. पहाटेच्या वेळी ‘चांगभलं’च्या गजराने अवघी दख्खननगरी दुमदुमली. श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख तीर्थ मार्गे पायी चालत खेटेकरी भाविक जोतिबा मंदिरात दाखल झाले. ‘चांगभलं’चा गजर करीत भाविकांनी दर्शन घेतले. चालत आलेल्या भाविकांना सेवाभावी संस्था, मंडळे यांनी प्रसाद वाटप केला.सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक झाला. मुख्य पुजारी यांच्या हस्ते अभिषेक झाला. केरबा उपाध्ये, शरद बुरांडे, बंडा उमराणी, सूरज उपाध्ये, प्रकाश उपाध्ये यांनी मंत्रपठण केले. सुनील भिवदर्णे यांनी जोतिबाची अलंकारित बैठी महापूजा बांधली. सकाळी ११ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजमासह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला. भाविकांनी गुलाल, खोबऱ्यांची उधळण करीत धुपारतीचे दर्शन घेतले.पुजारी वर्गाचे सेवाभावी कार्यकर्ते, गनिमी कावा कोडोलीचे कार्यकर्ते, पुजारी समिती देवस्थान समिती व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक हजर होते. रात्री ८ वाजता जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघाला. पालखीवर गुलाल, खोबऱ्यांची उधळण झाली. रात्री ११ पर्यंत भाविक जोतिबा मंदिरात येत होते. माघ पौर्णिमा ते होळी पौर्णिमा दरम्यान येणारे हे खेटे रविवारी असतात. काही भाविक पारंपरिक पद्धतीने खेटेची सांगता करतात, तर काही भाविक पाच रविवार खेटे करून सांगता करतात.मंदिराभोवती पाच पदरी रांगाचौथ्या खेट्याला भाविकांमुळे मंदिरा- सभोवती चार-पाच पदरी दर्शनरांगा लागल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, कºहाड भागातील भाविकांबरोबरच कर्नाटक राज्यातील भाविक सहभागी होते. दर्शनरांगेवर नियंत्रणासाठी कोडोली पोलीस स्टेशनचे सपोनि संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात होते.