दीपक जाधव कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेला लाखोंच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ही दिंडी पुर्ण केल्या नंतर बारा जोतिर्लिग व चारधाम यात्रा केल्याचे पुण्य लाभत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.सकाळी साडेनऊ वाजता मुख्य मंदीरातून दिडी सोहळ्याची सुरुवात झाली. तत्पूर्वी विणा पुजना नंतर डवरी मार्गस्थ झाले. दिंडीच्या मध्यभागी विणा व डमरू घेऊन डवरी होते. त्यांच्या सोबत भगवे ध्वज घेऊन पुजारी व भाविक होते. धार्मिक विधी पुर्ण झाल्या नंतर मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून दिडी बाहेर पडून गायमुखाकडे मार्गस्थ झाली.दिंडीच्या मार्गावर भाविकासाठी विविध संस्था व भक्तांनी केळी, राजगिरा लाडू, खिचडी, पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. या दिंडीचा २५ कि.मी चा प्रवास भाविकांकडून पायात चप्पल न घालता रानातून चिखल तुडवत पार केला जातो. ही दिंडी पुर्ण होई पर्यंत भाविक बसत नाहीत. संध्याकाळी ७ नंतर दिडी अकरा जोतिर्लिगाचे दर्शन घेऊन यमाई मंदीर येथे आल्यानंतर आरती होईल व सुटवडा वाटपाने दिंडीची सांगता होईल.
Kolhapur- जोतिबा डोंगरावर लाखोंच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 2:26 PM